बाप-लेकाचे 2 ॲप; एकावर सुरक्षेचे धडे,दुसऱ्यावर 10 हजार कोटींचा गंडा:पिता 8 वी नापास, मुलगा 12 वी पास; 3.4 लाख लोकांना गंडा

ही कहाणी आहे ८ वी नापास पिता व त्याच्या १२वी पास मुलाची. या दोघांनी १५ राज्यांमध्ये असे सिंडिकेट तयार केले की त्यांनी साडेतीन लाख लोकांना तब्बल १० हजार कोटी रुपयांना गंडा घातला. आरोपी राजस्थानच्या श्रीगंगानगरचे आहेत. आरोपी लाजपत आर्य नायक व त्याचा मुलगा दीपक दोघांनाही अटक झाली आहे. लाजपतचा दुसरा मुलगा फरार आहे. इतर ३ आरोपी परदेशी पसार झाल्याचा संशय आहे. या आरोपींनी दोन ॲप बनवले होते. एक टीचेबल तर दुसरे कॅपमोर एफएक्स. टीचेबलमध्ये सायबर फ्रॉडविषयी जनजागृती व शेअर बाजाराचे धडे दिले जायचे. १८-२० दिवसांचे प्रशिक्षण देऊन नंतर त्यांना कॅपमोर एफएक्स ॲपवर गुंतवणूक करण्यास सांगून गंडा घालायचा. १५ राज्यांत जाळे, श्रीगंगानगर-जयपुरात आलिशान बंगले श्रीगंगानगरचे एसपी गाैरव यादव म्हणाले, कर्नाटकच्या कटप्पा बाबू यांनी श्रीगंगानगर ठाण्यात आरोपींविरोधात ४.५ कोटींचा फसवणुकीची तक्रार केली तेव्हा हा घोटाळा उघडकीस आला. पहिल्या तक्रारीचा तपास केला तेव्हा ७५ खात्यांवर कोट्यवधींचे व्यवहार दिसले. स्पॅमची तक्रार असलेल्या एका खात्यावर ६७,००० तक्रारी मिळाल्या. याप्रकरणी लाजपत आर्य नायक व दीपकची पोलिस कोठडी संपल्यावर त्यांची कारागृहात रवानगी झाली आहे. या राज्यांमध्ये गुन्हे महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र, तेलंगण, पंजाब, तामिळनाडू, बिहार, हरियाणा, चंदीगड, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश व ओडिशा आदी १५ राज्यांतील ३.४० लाख सायबर फसवणुकीचे ५ हजार गुन्हे दोघांवर आहेत. अजय : मास्टरमाइंड लाजपतचा थोरला मुलगा. 12वी पास. कॅपमोर एफएक्स कंपनीचा एमडी हाच आहे.
बलजित : बोगस डॉक्टर होता. तो मास्टर ट्रेनर म्हणून वावरायचा. कमाईच्या नवनव्या क्लृप्त्या सांगायचा.
सौरभ : बीकॉम पास. सेमिनारमध्ये कॅपमोर सॉफ्टवेअरचे डिटेल्स समजावून गुंतवणुकीचा सल्ला देत होता.
सलोनी : सौरभची पत्नी. सलोनीही प्रशिक्षण द्यायची.गोड-गोड बोलून गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढायची. कर्मजित : सोशल मीडिया ट्रेनर. टीचेबल आणि कॅपमोरचा सोशल मीडियावर प्रचार–प्रसार करत होता. हे ५ भामटे … या सायबर फ्रॉडमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका पिता लाजपत, मुलगा दीपक. लाजपत बोगस डॉक्टर होता आज 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्तीचा मालक. आरोपी १० वर्षांपूर्वी मजुरी करायचे. फसवणुकीच्या पैशातून आज केवळ श्रीगंगानगरच नव्हे तर जयपूरमध्येही बंगले, महागड्या कारही आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment