गणेशोत्सावत पुण्यात 14 लाखांचे भेसळ अन्नपदार्थ जप्त:अन्न व औषध प्रशासनाने राबविले विशेष अभियान

पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या गणेशाेत्सवात पुणे व अाजूबाजूच्या परिसरात अन्न व अाैषध प्रशासनाने अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यां विराेधात विशेष अभियान राबवले. यामध्ये पुणे शहरात पाच लाख १६ हजार ४३८ रुपयांचे बनावट अन्नपदार्थ तर पुणे विभागात नऊ लाख १९ हजार५२० रुपयांचे भेसळ अन्नपदार्थ जप्त करण्यात अाले. अशाप्रकारे एकूण १४ लाख ३५ हजार ९५८ रुपयांचे भेसळ अन्नपदार्थ जप्त करण्यात अाल्याची माहिती अन्न व अाैषध विभागाने दिली अाहे. या अभियानाचा उद्देश हा उत्साह प्रसंगात नागरिकांना शुध्द व चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ देणे हा हाेता. त्यानुसार अन्न सुरक्षा अाणि मानक कायदा २००६ नुसार या अभियान अंर्तगत पुणे जिल्हयातील वेगवेगळया ४८ खाद्यपदार्थाची तपासणी करण्यात अाली. यामध्ये दूध, खवा, पनीर, मावा, तूप, लाेणी व नमकीनचे ५३ नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यात अाली. त्याबाबतचा अहवाल अाल्यानंतर संबंधित कारवाई करण्यात अाली अाहे. पुणे जिल्हयात गाईचे तूप, लाेणी, खवा यात काही ठिकाणी भेसळ असल्याचे दिसून अाले अाहे. तर, पुणे विभागात १०१ अन्नपदार्थाची तपाससणी करण्यात अाली त्यात ११७ नमुने घेऊन नऊ लाख १९ हजार ५२० रुपयांचे भेसळ खाद्यपदार्थ जप्त करण्यात अाल्याची माहिती अन्न व अाैषध प्रशासनाचे पुणे विभाग सहअायुक्त सुरेश अन्नपुरे यांनी दिली अाहे. नागरिकांना ज्या अन्नपदार्थात भेसळ हाेत अाहे अशी शंका त्यांनी टाेल फ्री नंबर १८००-२२२-३६५ वर तक्रार करावी असे सांगितले अाहे.

​पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या गणेशाेत्सवात पुणे व अाजूबाजूच्या परिसरात अन्न व अाैषध प्रशासनाने अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यां विराेधात विशेष अभियान राबवले. यामध्ये पुणे शहरात पाच लाख १६ हजार ४३८ रुपयांचे बनावट अन्नपदार्थ तर पुणे विभागात नऊ लाख १९ हजार५२० रुपयांचे भेसळ अन्नपदार्थ जप्त करण्यात अाले. अशाप्रकारे एकूण १४ लाख ३५ हजार ९५८ रुपयांचे भेसळ अन्नपदार्थ जप्त करण्यात अाल्याची माहिती अन्न व अाैषध विभागाने दिली अाहे. या अभियानाचा उद्देश हा उत्साह प्रसंगात नागरिकांना शुध्द व चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ देणे हा हाेता. त्यानुसार अन्न सुरक्षा अाणि मानक कायदा २००६ नुसार या अभियान अंर्तगत पुणे जिल्हयातील वेगवेगळया ४८ खाद्यपदार्थाची तपासणी करण्यात अाली. यामध्ये दूध, खवा, पनीर, मावा, तूप, लाेणी व नमकीनचे ५३ नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यात अाली. त्याबाबतचा अहवाल अाल्यानंतर संबंधित कारवाई करण्यात अाली अाहे. पुणे जिल्हयात गाईचे तूप, लाेणी, खवा यात काही ठिकाणी भेसळ असल्याचे दिसून अाले अाहे. तर, पुणे विभागात १०१ अन्नपदार्थाची तपाससणी करण्यात अाली त्यात ११७ नमुने घेऊन नऊ लाख १९ हजार ५२० रुपयांचे भेसळ खाद्यपदार्थ जप्त करण्यात अाल्याची माहिती अन्न व अाैषध प्रशासनाचे पुणे विभाग सहअायुक्त सुरेश अन्नपुरे यांनी दिली अाहे. नागरिकांना ज्या अन्नपदार्थात भेसळ हाेत अाहे अशी शंका त्यांनी टाेल फ्री नंबर १८००-२२२-३६५ वर तक्रार करावी असे सांगितले अाहे.  

Share