कुटुंबातच सामना:बीडला भावाकडून भावाचा, नांदेडला बहिणीचा पराभव; मराठवाड्यात रक्ताच्या नात्यांमधील लढतींमुळे गाजली विधानसभा निवडणूक
मराठवाड्यात अनेक मतदारसंघांमध्ये एकाच कुटुंबातील किंवा नात्यांमधील उमेदवार रिंगणात होते. काही लढती थेट नात्यांमध्येझाल्या. त्यामुळे नातीगोती विसरुनप्रचारात नेत्यांनी एकमेकांवरआगपाखड केली. त्यातनांदेडमधील हंबर्डे बंधू, बीडमधीलक्षीरसागर बंधू यांच्यातील लढतींची अधिक चर्चा झाली. भावाची बहिणीवर सरशी जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात अजित पवारगटाकडून प्रतापरावपाटील चिखलीकरविजयी झाले. त्यांच्याविरोधात शेकापकडूनत्यांच्या भगिनी आशाशिंदे पराभूत झाल्या.मोठ्या मताधिक्यानेचिखलीकर यांनी विजयप्राप्त केला. विशेष म्हणजे२०१९च्या विधानसभानिवडणुकीत चिखलीकरयांनी त्यांचे मेहुणे श्यामसुंदर शिंदे यांनानिवडून आणले होते. मात्र यावेळी तेएकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. लातूरला एक भाऊ पराभूत, दुसरा विजयी लातूर शहर मतदारसंघात काँग्रेसचे अमित देशमुखविजयी झाले. त्यांनी भाजपच्या अर्चना पाटील चाकूरकरयांचा पराभव केला. तर लातूर ग्रामीण मतदारसंघातकाँग्रेसचे धीरज देशमुख यांना पराभवाचा सामना करावालागला. या ठिकाणी भाजपचे रमेश कराड विजयी झाले. गेवराईत पुतण्याकडून काका पराभूत गेवराईत अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित यांनी,त्यांचे काका तथा ठाकरे गटाचे उमेदवार बदामरावपंडित यांचा ४२ हजार ३९० मतांनी पराभव केला.बीडमध्ये दोन भावांमध्ये लढत महाविकासआघाडीतील शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांनी,महायुतीमधील अजित पवार गटाचे डॉ.योगेश क्षीरसागरयांचा ५३२४ मतांनी पराभव केला. नांदेडला दोघे हंबर्डे बंधू पराभूत नांदेडला भाजपकडून लोकसभा पोटनिवडणुकीसाठी डॉ.संतुकराव हंबर्डे रिंगणात होते.तर काँग्रेसकडून नांदेडद क्षिणमधून मोहनराव हंबर्डेलढत होते. एक भाऊ भाजपआणि दुसरा भाऊ काँग्रेसकडूननिवडणूक लढवत होते. दरम्यानभावाला भाजपकडून उमेदवारीमिळाल्यानंतर मोहन हंबर्डे यांनीभाजपवर निशाणा साधला होता.भाजप नेत्यांनी पक्ष फोडलात्यानंतर आता भावालानिवडणुकीत उतरवून आमचं घरफोडलं असा आरोप केला.