सोने 96 हजारांच्या विक्रमी पातळीवर:पहिल्या तिमाहीमध्येच 15 टक्क्यांहून अधिक वाढले सोने

सोमवारी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली. अहमदाबादमधील सौदा बाजारात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९६,३४० रुपयांच्या ऐतिहासिक पातळीवर गेला. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) वर सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹९३,७४५ वर बंद झाला. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात सकाळी १०.५० पर्यंत (भारतीय वेळेनुसार) सोन्याचा दर प्रति औंस ३,२२६.७३ डॉलरवर होता. जानेवारी ते मार्च २०२५ या पहिल्या तिमाहीत सोन्याच्या भावत १५% हून अधिक वाढ झाली. दरम्यानच्या काळात भावात थोडीशी घट झाली असली तरी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन कर जाहीर केल्यावर बाजारात पुन्हा अनिश्चितता वाढली. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे वरिष्ठ विश्लेषक मानव मोदी म्हणाले की, सोन्याच्या भावात सध्याची वाढ भू-राजकीय तणाव, केंद्रीय बँकांकडून होणारी खरेदी व जागतिक आर्थिक धोरणांबाबतची अनिश्चितता यामुळे झाली आहे. डिसेंबरपर्यंत आणखी १४.६ % महाग शक्य : गाेल्डमॅन गाेल्डमॅन सॅक्सनुसार २०२५ च्या अखेरीस साेन्याचे दर ३,७०० डाॅलर प्रती आैंस हाेऊ शकते. म्हणजे डिसेंबरपर्यंत त्यात १४.६ % शक्यता आहे. इन्व्हेस्टमेंट बँकेनुसार केंद्रीय बँकांची अपेक्षेपेक्षा जास्त खरेदी व जागतिक मंदीच्या भीतीने ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढल्याने साेन्यात तेजी येत आहे.