गुंड नेत्याला वाचवले, पण सरपंचाला न्याय नाही:मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, म्हणाले – धनंजय मुंडे सहआरोपी होता होता वाचले

गुंड नेत्याला वाचवले, पण सरपंचाला न्याय नाही:मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, म्हणाले – धनंजय मुंडे सहआरोपी होता होता वाचले

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने 1500 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हाच हत्येमागचा मुख्य सुत्रधार असल्याचा दावा सीआयडीने या आरोपपत्रात केला आहे. मात्र, या खून प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. तसेच आता बीडमध्ये खून, खंडणी, जमीन बळकावण्याचे प्रकार घडल्यास यांच्या टोळीला सुट्टी नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला. ते पुण्यातील खेड येथे माध्यमांशी बोलत होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचे नाव आल्याने धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांनी राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. विरोधकांसह महायुतीच्या नेत्यांनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यातच धनंजय मुंडे यांचा 3 मार्च रोजी राजीनामा होणार असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा होत आहे. त्यातच मनोज जरांगे यांनी उपरोक्त आरोप केला आहे. नेमके काय म्हणाले मनोज जरांगे?
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात खोटा अजेंडा राबवल्याने धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सह आरोपी केले नाही, यात मुंडेना शिक्षा झाली असती मात्र राजकिय मित्राला वाचवल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला. हे प्रकरण सोईस्कर पद्धतीने संपवले आहे. राजकीय लोकांची राजकीय मैत्री जागी झाली. ही मैत्री जागी झाली की, सर्वसामान्य जनतेला अन्याय सहन करावा लागतो, असेही जरांगे म्हणाले. बडा नेता कोण आहे? हा विषय न्यायालयाच्या पटलावर आला की बड्या नेत्याला फोन केला, मात्र सरकारने नेता वाचवला. या नेत्याचा हात शंभर टक्के आहे, असा दावा मनोज जरांगे यांनी केला. तसेच सरकारने गुंड मित्र वाचवला, असा आरोपही जरांगे यांनी केला. आता बीडमध्ये खून, खंडणी, जमीन बळकविण्याचे प्रकार घडल्यास यांच्या टोळीला सुट्टी नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला. संतोष देशमुख प्रकरणाचे चार्जशीट अजून दोन महिने दाखल होणार नाही अशी अपेक्षा होती. त्या चार्जशीटमध्ये फोडाफोडी होणार नाही यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती मागणी करण्यात आली होती. मात्र त्यांच्या नियुक्तीच्या दुसऱ्या दिवशीच चार्जशीट दाखल करण्यात आली. धनंजय मुंडे सहआरोपी होता होता वाचले. त्यांना वाचवण्यात आले असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. गुंड नेत्याला वाचवले, पण सरपंचाला न्याय नाही
छुपा राजकीय अजेंडा चालवून गुंड आणि राजकीय मित्र वाचवला. मात्र तुमच्या पक्ष प्रामाणिक सरपंचाला न्याय देऊ शकला नाही, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी भाजपवर केला. सरकारच्या प्रतिनिधींनी पद्धतशीरपणाने त्यांचे राजकीय गुंड मित्रासह टोळीही वाचवली. मात्र पुढील तपासात काही सहआरोपी होतात पाहू. मात्र न झाल्यास पुढील काळात त्रास देणाऱ्या टोळीविरोधात आमची मोहिम असेल, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment