हिंगोली जिल्ह्यात हृदयद्रावक घटना:बोंडाळा शिवारात रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, बासंबा पोलिसांत नोंद

हिंगोली जिल्ह्यात हृदयद्रावक घटना:बोंडाळा शिवारात रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, बासंबा पोलिसांत नोंद

हिंगोली ते वाशीम रेल्वेमार्गावर बोंडाळा शिवारात रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात बुधवारी दुपारी नोंद झाली आहे. संदीप प्रकाश हनवते (२३, रा. आडगाव, ता. हिंगोली), असे मयताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील आडगाव येथील तरुण संदीप हनवते हा मंगळवारी सकाळी दहा वाजल्या पासून बेपत्ता होता. बाहेर जाऊन येतो असे सांगून तो घराबाहेर पडला होता. रात्री उशीरापर्यंत तो घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध सुरु केला होता. मात्र त्याचा कुठेही शोध लागला नाही. दरम्यान, हिंगोली ते वाशीम रेल्वे मार्गावर बोंडाळा शिवारात रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती बासंबा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून बासंबा पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक संदीप जमादार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अंभोरे, मदन गव्हाणे, खंडेराव नरोटे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी मृतदेहाचे डोके धडावेगळे झाले होते. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरु केला असता आडगाव येथील तरुण बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी आडगाव येथे संपर्क साधून बेपत्ता तरुणाच्या कुटुंबियांना बोलावले. त्यावरून सदर मृतदेह संदीप याचा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी प्रकाश हनवते यांनी बासंबा पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अंभोरे पुढील तपास करीत आहेत.

​हिंगोली ते वाशीम रेल्वेमार्गावर बोंडाळा शिवारात रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात बुधवारी दुपारी नोंद झाली आहे. संदीप प्रकाश हनवते (२३, रा. आडगाव, ता. हिंगोली), असे मयताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील आडगाव येथील तरुण संदीप हनवते हा मंगळवारी सकाळी दहा वाजल्या पासून बेपत्ता होता. बाहेर जाऊन येतो असे सांगून तो घराबाहेर पडला होता. रात्री उशीरापर्यंत तो घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध सुरु केला होता. मात्र त्याचा कुठेही शोध लागला नाही. दरम्यान, हिंगोली ते वाशीम रेल्वे मार्गावर बोंडाळा शिवारात रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती बासंबा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून बासंबा पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक संदीप जमादार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अंभोरे, मदन गव्हाणे, खंडेराव नरोटे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी मृतदेहाचे डोके धडावेगळे झाले होते. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरु केला असता आडगाव येथील तरुण बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी आडगाव येथे संपर्क साधून बेपत्ता तरुणाच्या कुटुंबियांना बोलावले. त्यावरून सदर मृतदेह संदीप याचा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी प्रकाश हनवते यांनी बासंबा पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अंभोरे पुढील तपास करीत आहेत.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment