भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक मार्गात बदल:हिंगोली पोलिस अधिक्षकांनी काढले आदेश

भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक मार्गात बदल:हिंगोली पोलिस अधिक्षकांनी काढले आदेश

हिंगोली शहरात विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता सोमवारी दुपारपासून वाहतुक मार्गात बदल करण्यात आला असून याबाबतचे आदेश पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले आहेत. हिंगोली शहरातील विघ्नहर्ता चिंतामणी गणपीच्या दर्शनासाठी सुमारे दोन लाख भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांच्या सोयीसाठी संस्थानने ठिकठिकाणी वॉटर प्रुफ मंडप उभारले आहेत. तर पोलिस विभागाच्या वतीने सुरक्षेच्या कडक उपाययोजना केल्या आहेत. जिल्हाभरातील मोठा पोलिस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला जाणार आहे. हिंगोली शहर, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह वाहतुक शाखेचे कर्मचाऱ्यांना आवश्‍यक सुचनाही देण्यात आल्या आहेत. पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सुधीर वाघ यांच्याकडून पाहणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान, भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील वाहतूक व्यवस्थेमधे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी दुपारपासून ते मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत वाहतूक बदल कायम राहणार आहे. यामध्ये पूर्णतः बंद करण्यात आलेल्या मार्गामध्ये इंदिरा गांधी चौक ते अंबिक टॉकीज रोड, महात्मा गांधी चौक ते मसानी पेठ चौक, महात्मा गांधी चौक ते खुरामा पेट्रोलपंप, जुनी नगर पालिका चौक ते अबिंका टॉकीज, जूनी गोदावरी हॉटेल कॉर्नर ते महात्मा गांधी चौक हे रस्ते वाहतूकीसाठी पूर्णतः बंद असणार आहेत. वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था जवळा पडळी रोडने येणारी वाहने खुशालनगर, नवा मोंढा, रेल्वेस्टेशन रोडने येतील व परत जातील. कळमनुरी व औंढा नागनाथ कडून येणारी वाहने नांदेडनाका, जिल्हा परिषद रोडने येतील व जातील. वाशीमकडून येणारी वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिल्हा परिषद रोड, नांदेडनाका मार्गे येतील व जातील.

​हिंगोली शहरात विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता सोमवारी दुपारपासून वाहतुक मार्गात बदल करण्यात आला असून याबाबतचे आदेश पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले आहेत. हिंगोली शहरातील विघ्नहर्ता चिंतामणी गणपीच्या दर्शनासाठी सुमारे दोन लाख भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांच्या सोयीसाठी संस्थानने ठिकठिकाणी वॉटर प्रुफ मंडप उभारले आहेत. तर पोलिस विभागाच्या वतीने सुरक्षेच्या कडक उपाययोजना केल्या आहेत. जिल्हाभरातील मोठा पोलिस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला जाणार आहे. हिंगोली शहर, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह वाहतुक शाखेचे कर्मचाऱ्यांना आवश्‍यक सुचनाही देण्यात आल्या आहेत. पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सुधीर वाघ यांच्याकडून पाहणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान, भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील वाहतूक व्यवस्थेमधे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी दुपारपासून ते मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत वाहतूक बदल कायम राहणार आहे. यामध्ये पूर्णतः बंद करण्यात आलेल्या मार्गामध्ये इंदिरा गांधी चौक ते अंबिक टॉकीज रोड, महात्मा गांधी चौक ते मसानी पेठ चौक, महात्मा गांधी चौक ते खुरामा पेट्रोलपंप, जुनी नगर पालिका चौक ते अबिंका टॉकीज, जूनी गोदावरी हॉटेल कॉर्नर ते महात्मा गांधी चौक हे रस्ते वाहतूकीसाठी पूर्णतः बंद असणार आहेत. वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था जवळा पडळी रोडने येणारी वाहने खुशालनगर, नवा मोंढा, रेल्वेस्टेशन रोडने येतील व परत जातील. कळमनुरी व औंढा नागनाथ कडून येणारी वाहने नांदेडनाका, जिल्हा परिषद रोडने येतील व जातील. वाशीमकडून येणारी वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिल्हा परिषद रोड, नांदेडनाका मार्गे येतील व जातील.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment