तासगाव मतदारसंघात तिसऱ्या आघाडीची शक्यता:रोहित पाटलांची विधानसभेची वाट बिकट, खासदार विशाल पाटील घोरपडेंच्या बाजूने

तासगाव मतदारसंघात तिसऱ्या आघाडीची शक्यता:रोहित पाटलांची विधानसभेची वाट बिकट, खासदार विशाल पाटील घोरपडेंच्या बाजूने

तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या नेतृत्वात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होऊ शकतो. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी देखील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित घोरपडे यांच्या सोबत राहण्याचे जाहीर केले आहे. लोकसभेला जसा अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नाही तसा विधानसभेला देखील त्यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे विशाल पाटील म्हणाले आहेत. तासगावच्या मणेराजुरी येथे आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते व स्वर्गीय माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र आता खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या विधानामुळे येथील राजकारणाला वेगळे वळण मिळत असल्याचे दिसत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र आता या मतदारसंघात ही दोन्ही घराणी नकोत म्हणून तिसरी आघाडी अजित घोरपडे यांच्या नेतृत्वात तयार होताना दिसत आहे. तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे खासदार विशाल पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आघाडीच्या माध्यमातून लोकांसमोर पर्याय उभा करण्याचा तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात प्रयत्न सुरू करण्यात आला. मात्र या तिसऱ्या आघाडीमुळे रोहित पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, तासगाव येथे झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात संजय काका पाटील यांनी प्रभाकर पाटील यांना निवडणुकीत उतरवण्याचे सुतोवाच केले होते. त्यामुळे यंदाची निवडणूक आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील आणि प्रभाकर पाटील यांच्यात होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. गेली अनेक वर्षे तासगाव-कवठेमहांकाळची आमदारकी स्व. आर. आर. पाटील यांच्या घरातच आहे. त्यांच्या विरोधात स्व. दिनकर (आबा) पाटील यांचा तसेच माजी खासदार संजय पाटील यांचा गट निवडणुकीत उतरत होता. अंजनी म्हणजे आर आर पाटील आणि चिंचणी म्हणजे संजयकाका पाटील या दोन्ही गावच्या नेत्यांनीच आजपर्यंत तालुक्यात आणि मतदारसंघाचे राजकारण केले आहे. मात्र यात आता तिसरी आघाडी निर्माण झाल्यावर मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

​तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या नेतृत्वात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होऊ शकतो. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी देखील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित घोरपडे यांच्या सोबत राहण्याचे जाहीर केले आहे. लोकसभेला जसा अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नाही तसा विधानसभेला देखील त्यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे विशाल पाटील म्हणाले आहेत. तासगावच्या मणेराजुरी येथे आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते व स्वर्गीय माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र आता खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या विधानामुळे येथील राजकारणाला वेगळे वळण मिळत असल्याचे दिसत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र आता या मतदारसंघात ही दोन्ही घराणी नकोत म्हणून तिसरी आघाडी अजित घोरपडे यांच्या नेतृत्वात तयार होताना दिसत आहे. तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे खासदार विशाल पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आघाडीच्या माध्यमातून लोकांसमोर पर्याय उभा करण्याचा तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात प्रयत्न सुरू करण्यात आला. मात्र या तिसऱ्या आघाडीमुळे रोहित पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, तासगाव येथे झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात संजय काका पाटील यांनी प्रभाकर पाटील यांना निवडणुकीत उतरवण्याचे सुतोवाच केले होते. त्यामुळे यंदाची निवडणूक आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील आणि प्रभाकर पाटील यांच्यात होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. गेली अनेक वर्षे तासगाव-कवठेमहांकाळची आमदारकी स्व. आर. आर. पाटील यांच्या घरातच आहे. त्यांच्या विरोधात स्व. दिनकर (आबा) पाटील यांचा तसेच माजी खासदार संजय पाटील यांचा गट निवडणुकीत उतरत होता. अंजनी म्हणजे आर आर पाटील आणि चिंचणी म्हणजे संजयकाका पाटील या दोन्ही गावच्या नेत्यांनीच आजपर्यंत तालुक्यात आणि मतदारसंघाचे राजकारण केले आहे. मात्र यात आता तिसरी आघाडी निर्माण झाल्यावर मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment