जगण्याची जिद्द:कंबरेवर मोठे आतडे, मूत्रपिशवी बांधून तो रोज 30 किमी चालवतो सायकल; अपघातात अवयव गमावले, इतरांसाठी प्रेरक
छत्तीसगडमधील रायपूर येथील शुभम शर्मा जगण्याची तीव्र इच्छा आणि धैर्यातून विजयाचे उदाहरण ठरले आहे. १० वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातात शरीराचे अनेक भाग गमावलेल्या शुभमच्या कंबरेजवळ शस्त्रक्रियेनंतर मोठे आतडे व मूत्र पिशवी बांधली आहे. या अवस्थेत तो दररोज ३० किमी सायकल चालवतो. तो लोकांना भेटतो आणि त्यांना सर्व परिस्थितीत आनंदी राहण्याची प्रेरणा देतो. २०१५ मध्ये १८ चाकी ट्रक त्याच्यावरून गेला. तो २५ फूट फरफटत गेला. डॉक्टरांनी त्याच्या जगण्याची आशा सोडली होती. तरीही त्याचा जीव वाचला. डॉक्टरांनी आशा सोडली होती. डॉक्टरांची जिद्द… शुभमला धावतानाही पाहायचेय रायपूरच्या एका रुग्णालयात डॉक्टरांच्या पथकाने शुभमवर उपचार केले. तेथील प्लास्टिक सर्जन विवेक चौबे यांनी आशा सोडली नाही. ते शुभमवर उपचार करत आहेत. ते म्हणतात- तो उभे राहील असे वाटले नव्हते. पण तो सायकल चालवतो. म्हणूनच शुभमला धावताना पाहायचे आहे. डॉक्टरांच्या या प्रयत्नामुळे शुभमला खूप मदत झाली. आज तो चालत आहे आणि सायकल चालवत आहे. तो धावूही शकतो. डॉक्टरांचा शुभमला खूप आधार मिळाला. शुभम म्हणतो- घराजवळील एका भय्यांना एक पाय नाही. तेही सायकल चालवतात. त्यांना पाहून सायकल चालवण्याची इच्छा झाली. त्यांनी प्रोत्साहन दिले. आधी खूप त्रास झाला, पण नंतर मी सुरुवात केली. पूर्वी १ किलोमीटरही कठीण होते. आता ३० किमी चालवतो.