जवळपास 200 पोलिस अधिकारी कर्मचारी आकाचे प्रेमी:लवकरच यादी मुख्यमंत्र्यांना देणार, थेट मराठवाड्याच्या बाहेर बदली करण्याची सुरेश धसांची मागणी

जवळपास 200 पोलिस अधिकारी कर्मचारी आकाचे प्रेमी:लवकरच यादी मुख्यमंत्र्यांना देणार, थेट मराठवाड्याच्या बाहेर बदली करण्याची सुरेश धसांची मागणी

बीड संतोष देशमुख प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील उडी घेतली आहे. बीडमधील 26 पोलिस अधिकारी हे वाल्मीक कराडच्या मर्जीतील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच वाल्मीक कराडच्या मर्जीतले पोलिस अधिकाऱ्यांची बीडमधून बदली करण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे. तृप्ती देसाई यांच्या आरोपावर आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देत म्हंटले की त्यांनी सांगितलेला 26 हा फार कमी आकडा आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले, तृप्ती देसाई यांनी सांगितलेला 26 हा फार कमी आकडा आहे. सर्व कर्मचारी पोलिस अधिकारी यांची जर बेरीज केली तर ती 200 इतकी होईल. मी लवकरच यादी करणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना देणार आहे, असे सुरेश धस म्हणाले आहेत. सुरेश धस म्हणाले, फक्त 26 नाही तर 150 ते 200 अधिकारी हे वाल्मीक कराडच्या मर्जीतले असतील. तृप्ती देसाई यांनी 26 हा फार कमी आकडा सांगितला आहे. सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बेरीज केली तर 200 इतकी होईल. त्यांनी हा आकडा कमी सांगितला आहे. मी लवकरच या सर्वांची यादी मुख्यमंत्र्यांना देणार आहे. या सर्वांची बदली बीडच्या बाहेर नव्हे तर मराठवाड्याच्या बाहेर करावी, असेही मी त्यांना सांगणार आहे. पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, आकाचे पोलिस दलातील जे प्रेमी आहेत. आतापर्यंत एसपींनी पोलिस दलातच कसे ठेवले. मी कितीतरी वेळा याबद्दल बोललो आहे. महादेव मुंडेचे आरोपी आकाच्या मुलाच्या अवतीभवती फिरत होते. ते लगेच गायब झाले. त्या डीवायएसपी यांनी देखील अजून चार्ज घेतला नाही. ते सुद्धा आकाचेच आहेत, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. सुरेश धस म्हणाले, महादेव मुंडेचे आरोपी सापडले पाहिजेत. ते 15 दिवसांच्या आत जेलमध्ये गेले पाहिजेत. त्याची हत्या होऊन 15 महीने झाले. अतिशय निर्घृण हत्या झाली. कॉलेजच्या ग्राऊंडमध्ये मारण्यात आले. त्यानंतर तहसीलदाराच्या दारात नेऊन टाकण्यात आले. एसपींनी ज्या पद्धतीने यंत्रणा हलवायला हवी, तशी यंत्रणा हलवली जात नाही, असेही सुरेश धस म्हणाले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी डॉक्टरांवर केलेल्या आरोपांवर भाष्य करताना सुरेश धस म्हणाले, डॉ. अशोक थोरात हा चांगला माणूस आहे. अंजली दमानिया यांनी चुकीची माहिती दिली. डॉक्टरांचीही चौकशी करावी लागेल. संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रीपोर्ट हा अतिशय क्लियर आहे. संतोष देशमुखांचे डोळे जाळलेले नव्हते हे आम्हीही मान्य करतो. पण त्यांना मारहाण केलेली होती. मला ही सर्व माहिती मिळाली. त्यानंतर मग माझा संताप झाला. मी हा विषय सभागृहात मांडला आणि मी त्या भूमिकेवर आजही ठाम आहे, उद्याही असेन, असे धस यांनी म्हंटले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment