जयकुमार गोरेंनी फेटाळले विनयभंगाचे आरोप:म्हणाले – कोर्टाने 2017 मध्येच निर्दोष मुक्त केले, आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. फडणवीसांचे लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वत:चे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. या आरोपांवर मंत्री जयकुमार गोरे स्पष्टीकरण दिले आहे. विनयभंग प्रकरणातून 2019 मध्येच निर्दोष मुक्त करण्यात आले होते, असे गोरे म्हणाले. तसेच माझ्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात मी सभागृहात हक्कभंग आणणार असून अब्रूनुकसानीचा देखील दावा ठोकणार, असा इशाराही त्यांनी दिला. ते आज विधानभवानात माध्यमांशी बोलत होते. याबाबत बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की, 2017 साली एक गुन्हा दाखल झाला होता. 2017 झाली माझ्या विधानपरिषदेची निवडणूक झाली. त्यानंतर म्हसवड नगरपालिकेची निवडणूक होती. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदर माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता. तो दाखल झालेला गुन्हा 2017 नंतर 2019 पर्यंत चालला आणि त्याचा निकाल लागला. या निकालात कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलेल आहे. यावेळी जयकुमार गोरे यांनी निकालाची प्रत माध्यमांसमोर दाखवली. जप्त केलेला मुद्देमाल मोबाईल नष्ट करण्याचे आदेश कोर्टाने त्याचवेळी दिले. खालच्या पातळीचे राजकारण विरोधकांनी केले या देशात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सर्वोच्च न्यायालय आहे. न्यायालयाने निकाल देऊन सहा वर्षे झाली आहेत. सहा वर्षांनंतर हा विषय समोर आला आहे. आपण कुठल्यावेळी हा विषय समोर आणावा किंवा कुठल्यावेळी काय बोलावे, याला राजकीय लोकांनी मर्यादा ठेवली पाहिजे, असा टोला जयकुमार गोरे यांनी विरोधकांना लगावला. ज्या वडिलांनी माझ्यासाठी संघर्ष करून मला मोठे केले, इथपर्यंत आणले, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्तीविसर्जन सुद्धा करू दिल्या नाहीत. एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण विरोधकांनी करावे, असे मला अपेक्षित नव्हते. राजकारण सगळ्या गोष्टी राहतात, असे जयकुमार गोरे म्हणाले. आरोप करणाऱ्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार या घटनेचा कोर्टाने निकाल दिलेला आहे. या संदर्भात ज्यांनी ज्यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे, त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आज सभागृहात आणणार असल्याचा इशारा जयकुमार गोरे यांनी दिला. संबंधितांवर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेल्या काम आहे. त्या संदर्भात मी बदनामीचा खटला आणि अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले. आरोपांची पोलिसांनी चौकशी करावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर जयकुमारे संबंधित महिलेच्या मागावर लागले, असाही आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की, मी त्रास दिला किंवा नाही दिला, यासंदर्भात पोलिसांनी चौकशी करावी. चौकशी नंतर जो कुणी दोषी आहे, मी असेल तर माझ्यावर आणि दुसरे कुणी असेल तर त्याच्यावर कारवाई करावी. जे खोटे पसरवून या भानगडी करत आहेत, त्यांच्यावरही कारवाई करावी. महिलेला फोटो पाठवले होते की नाही? कोर्टाने माझी निर्दोष मुक्तता केलेली आहे. मी कसलेही फोटो पाठवले नाहीत. कोर्टापेक्षा कुणीही मोठे नाही. यासंदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर असे आरोप केलेल आहेत, त्यांच्यावर मी हक्कभंग आणणार आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार, असा पुनरुच्चार जयकुमार गोरे यांनी केला.