कुंभमेळ्यात वाहनांचा प्रवेश रोखला, पूल सुरू केले, गर्दी टाळली…:..म्हणून निर्विघ्न पार पडले अमृतस्नान, 2.40 कोटी भक्तांचे स्नान

कुंभमेळ्यात मौनी अमावास्येला झालेल्या चेंगराचेंगरीने जबाबदार लोकांची झोप उडाली होती. या घटनेतून त्यांनी धडा घेतला. त्याचे सोमवारी दर्शन घडले. म्हणूनच वसंत पंचमीचे तिसरे अमृतस्नान चेंगराचेंगरी, गोंधळाविना शांततेत पार पडले. २.४० कोटींहून जास्त लोकांनी डुबकी घेतली. मौनी अमावास्येच्या दिवशी ७.५० कोटी भाविकांनी स्नान केले होते. तेव्हा गर्दी अनियंत्रित झाली होती. त्यामुळे संगमकिनारी झोपलेले लोक तुडवले गेले होते. त्यात ३० जणांचा मृत्यू झाला होता. म्हणूनच प्रशासनाने घाटावर कुणालाही झोपू दिले नाही. गर्दीला रेंगाळू दिले नाही. प्रत्येक वेळी ‘हर घाट संगम’ अशी उद्घोषणा केली गेली. कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री आदित्यनाथ पहाटे तीन वाजल्यापासून उच्चाधिकाऱ्यांसह लखनऊला वॉररूममध्ये हजर होते. क्षेत्रात बीएसएफसह केंद्रीय सुरक्षा दलास तैनात केले होते. पहाटे ४.३० वाजता नागा साधूंद्वारे स्नानाला सुरुवात झाली. नंतर १३ आखाड्यांनी वारंवार डुबकी घेतली. आखाडा परिषद अध्यक्ष रवींद्र पुरी म्हणाले, ८ पासून आखाड्यांची रवानगी सुरू होईल. अयोध्येत २६ जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे एक कोटी भाविकांनी श्रीरामांचे दर्शन घेतले.
चेंगराचेंगरी : कोर्टाचा सुनावणीस नकार सर्वोच्च न्यायालयाने कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत मृत्यू याचिकेवर सुनावणीस नकार दिला. कोर्ट म्हणाले, याचिकाकर्त्याने अलाहाबाद हायकोर्टात जावे. तेथे आधीच याचिका दाखल आहे. या वेळी केले हे ६ महत्त्वपूर्ण बदल, गर्दीनेही साथ दिली 1. वाहने रोखली : आतापर्यंत वाहनांना मेळा क्षेत्रात प्रवेश होता. परंतु या वेळी प्रवेश रोखला होता.
2. घाट लगेच रिकामे केले : संगमावर स्नानानंतर लोकांना लगेच बाहेर काढून घाट रिकामा केला जात होता. आधी लोक रेंगाळत होते.
3. प्रवेश-बाहेरचा मार्ग वेगळा : येण्या-जाण्याचे सगळे मार्ग वेगवेगळे केले. लोकांना रोखले.
4. सगळे पूल सुरू केले : सर्व ३० तात्पुरते पूल दिवसभर सुरू ठेवले. ते एकेरी ठेवले गेले. स्नानानंतर लोकांना बाहेर जावे लागले.
5. गर्दी वळवली : बॅरिकेडिंग केले. जवळच्या घाटावर स्नान केले गेले.
6. आखाडा मार्ग रिकामा : आखाडा मार्ग सामान्यांसाठी बंद. कुंभात अग्निस्नान : कुंभमेळ्यात अनेक साधूंनी अमृतस्नानानंतर अग्निस्नान साधना सुरू केली. त्यास पंचधुनी तपस्याही संबाेधतात. साधक अग्निच्या रिंगणात बसून ध्यान करताे. वैष्णव आखाड्याच्या खालसा परंपरेचा हा भाग आहे. त्यात साधक सहनशक्ती व अध्यात्मिक शिस्त शिकताे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment