कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणे योग्य नाही:न्याय मागताना संयम बाळगावा, शिवराजच्या वर्तवणुकीवर अजित पवारांचा सल्ला

कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणे योग्य नाही:न्याय मागताना संयम बाळगावा, शिवराजच्या वर्तवणुकीवर अजित पवारांचा सल्ला

अहिल्यानगर येथे 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. मात्र, या स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत झालेल्या गोंधळामुळे स्पर्धेच्या गालबोट लागले. पैलवान शिवराज राक्षे यांने पंचांनी चुकीचा निर्णय घेतल्याचा आरोप करत पंचांच्या छातीत लाथ घातली. या घडलेल्या प्रकारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणे योग्य नव्हते, असे अजित पवार म्हणालेत. पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात उपांत्य फेरी झाली. पंचांनी या सामन्याचा निकाल अवघ्या 40 सेकंदात दिला होता. पण शिवराजने खांदे जमिनीला टेकले नसल्याचे सांगत पंचांकडे रिव्ह्यूची मागणी केली. पण पंचांनी त्याच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले. शिवराजने पंचांना विनंती देखील केली, पण पंचांनी काही प्रतिसाद दिला नाही. यानंतर संतापलेल्या शिवराजने पंचांची कॉलर धरली आणि त्यांना लाथ देखील घातली. कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणे योग्य नव्हते. असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. न्याय मागताना संयम बाळगणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. अजित पवारांचा स्पर्धेच्या आयोजकांना सल्ला
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बक्षीस वितरणावेळी आयोजकांना सल्लाही दिला होता. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्यांना थार मोटार, बुलेरो कार तसेच 18 बुलेट, 20 स्प्लेंडर, 30 सोन्याच्या अंगठ्या अशी बक्षीस दिली जाणार आहे. मला कुठे पाहायला मिळाली नव्हती, असे अजित पवार म्हणाले. तसेच पुढच्या वेळेस जे स्पर्धा घेणार आहेत त्यांनी या बक्षिसांचाही विचार करावा आणि मग नंतर स्पर्धा घ्यावी. कारण शेवटी हा पायंडा पडतो, असा सल्लाही अजित पवार यांनी स्पर्धेच्या आयोजकांना दिला. अशा पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे – चंद्रहार पाटील
शिवराजने पंचांना लाथ मारून चूक केली, अशा पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे, असे विधान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केले. कुस्ती स्पर्धेत जे झाले ते चुकीचे होते. मॅटवर असणाऱ्या पंचांची चूक आहे. एका अंगावर असताना कुस्ती देण्यात आली. शिवराज 15-20 वर्षांची तपस्या करून महाराष्ट्र केसरीत तिसऱ्यांदा पोहचला होता. तुम्ही 10 सेकंदात त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करताय. पंचांना अशा प्रकारे शिक्षा मिळाली तरच पुढच्या काळात कुस्ती क्षेत्रात पंचांवर वचक बसेल, असेही चंद्रहार पाटील म्हणाले. … म्हणून मला टोकाचे पाऊल उचलावे लागले – शिवराज
सर्वकाही चुकीचे झाले असून सर्वांनी ते पाहिले आहे. मी वारंवार हेच सांगतो होतो की, रिव्ह्यु दाखवा. त्यानंतर निर्णय घ्या. त्यानंतर घेतलेला निर्णय मान्य आहे. पण ते व्हिडिओही दाखवत नव्हते. विनंती करूनही त्यांनी मान्य केले नाही. मला शिविगाळ केली. म्हणून मला टोकाचे पाऊल उचलावे लागले, असे शिवराज राक्षे याने सांगितले. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे एखाद्या खेळाडूचे नुकसान होत असेल तर महाराष्ट्रात किती खेळाडू आहेत, प्रत्येक खेळाडूवर अन्याय होत राहिला तर पंचांवर आक्षेप घेतला पाहिजे, असेही तो म्हणाला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment