लासूर स्टेशन:समृद्धी महामार्गावर पिकअपची कंटेनरला जोरदार धडक

प्रतिनिधी | लासूर स्टेशन लासूर स्टेशनजवळील समृद्धी महामार्गावर भरधाव पिकअपची कंटेनरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात उपचारादरम्यान चालकांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. दरम्यान धडकेनंतर अपघातग्रस्त पिकअप पलटी झाल्याने वाहनातून गोमांस वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. मात्र अपघातग्रस्त पिकअप एम.एच.१४ एल.एल.४२१५ मध्ये चालक गुतल्याने समृद्धी महामार्गाचे कर्मचाऱ्यांनी चालकाला अक्षरशः गाडी कापून बाहेर काढले त्यानंतर छुप्या मार्गाने गौमांस वाहतूक होत असल्याने बजरंग दल स्वयंसेवकांच्या लक्षात आल्यावर ते चांगलेच संतापले होते पोलिसांनी अपघाताची नोंद करून गोमांस वाहनांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती. पिकअप चालक नंदू वाल्मिक गांजवे (३५) रा.साकुर ता.संगमनेर व क्लीनर साहील मोहंमद शेख (२५)रा. संगमनेर हे दोघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच शिल्लेगावचे पोलिस निरीक्षक सलीम चाऊस फौजदार योगेश खटाने, बीट अंमलदार तात्यासाहेब बेंद्रे,राजेंद्र निसर्ग, विष्णू जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेतली पाठोपाठ महामार्ग सुरक्षा बलच्या जवानांनी जखमींना बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. चालकाचा उपचारादरम्यान घाटी दवाखान्यात मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान अजय पाटील साळुंके यांनी गोमांस तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई करावी अन्यथा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असा इशाराही दिला आहे.