स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी NCPची रणनीती:अजित पवार सोमवार ते बुधवार मुंबईत तर गुरुवार ते रविवार दौऱ्यावर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी अंतर्गत तयारीला सुरुवात केली आहे. यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आपली वेगळी रणनिती ठरवली आहे. यासाठी आता अजित पवार हे सोमवार ते बुधवार मुंबईत शासकीय कामकाज पाहणार आहेत. तर गुरुवार ते रविवार अजित पवार महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याच्या माध्यमातून अजित पवार पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आता आठवड्यातून एक दिवस मुंबईत आढावा बैठक घेण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या या बैठकीत अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री माणिकराव कोकाटे यांना देखील चांगलेच फैलावर घेतले होते. त्यानंतर आता अजित पवार यांच्या पुढील कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट रणनीती ठरवण्यात आली आहे. त्यानुसार आता अजित पवार हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक आढावा बैठक लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली. अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील विविध प्रश्नांबाबत तसेच प्रत्येक आमदाराच्या विधानसभा मतदारसंघातील कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. निधी अभावी कामे रखडत कामा नये, लोकांची गैरसोय होऊ नये, अशा सूचना अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना केल्या आहेत. त्याचप्रमाणे अधिक कार्यक्षम होण्यासाठी अजित पवार यांनी सर्वांना आग्रह केला. या बैठकी बाबत अजित पवार यांनी स्वतः एका पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे. अजित पवार यांनी कोकाटे यांना घेतले फैलावर या बैठकीला माणिकराव कोकाटे अर्धा तास उशिराने पोहोचले होते. तोपर्यंत राष्ट्रवादीचे इतर नेते देवगिरी बंगल्यावर दाखल होऊन बैठकीला सुरुवात देखील झाली होती. मात्र, माणिकराव कोकाटे उशिरा पोहोचल्याने अजित पवार यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. आधीच माणिकराव कोकाटे हे प्रसार माध्यमांमध्ये वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने पक्ष अडचणीत येताना दिसून येत आहे. त्यात अजित पवार यांच्या बैठकीला देखील माणिकराव कोकाटे उशिरा पोहोचले. पक्षाच्या वतीने आयोजित जनता दरबारात देखील ते हजर राहत नाहीत. या सर्व बेशिस्त वर्तवणुकीवरून अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना खडे बोल सुनावल्या ची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संबंधीत पूर्ण बातमी वाचा….