महाराष्ट्रात पुन्हा अवकाळीची शक्यता:राज्यातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्रात तापमानात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यात भारतीय हवामान विभागाने राज्यातील विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पावसाच्या इशाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये वातावरण उष्ण व दमट होत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात उकाडा सहन करावा लागत आहे. तसेच हवामान खात्याने आज 13 एप्रील रोजी 11 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली तसेच मराठवाड्यातील लातूर धाराशिव व मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे. 11 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने आज 13 एप्रील रोजी 11 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला असून उद्या विदर्भाकडून पूर्वेकडे खाली उतरत कोल्हापुरापर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजचे तापमान किती? मुंबई उपनगर: 33.5, मुंबई शहर: 33.8, ठाणे: 38.0, पालघर: 34.9, रायगड: 33.0, रत्नागिरी: 33.0, सिंधुदुर्ग: 33.0, पुणे: 37.7, सातारा: 37.2, सांगली: 35.8, कोल्हापूर: 35.8, सोलापूर: 40.2, नाशिक: 35.4, जळगाव: 38.5, नंदुरबार: 39.8, छत्रपती संभाजीनगर: 41.4, परभणी: 39.5, लातूर: 38.9, नांदेड: 39.2, अकोला: 40.2, वाशीम: 41.0, बुलढाणा: 38.6, अमरावती: 39.6, यवतमाळ: 39.5, वर्धा: 39.8, नागपूर: 41.1, चंद्रपूर: 42.6, गडचिरोली: 39.6, गोंदिया: 39.6