मला बोलू दिले जात नाही… राहुल गांधींचा लाेकसभा अध्यक्षांवर आराेप:ओम बिर्ला यांच्या सल्ल्यानंतर भडकले विरोधी पक्षनेते

मला लोकसभेत बोलण्याची संधी दिली जात नाही. सभागृह बिगरलोकशाही पद्धतीने चालवले जात आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी संसद परिसरात माध्यमांशी बोलताना केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा आरोप निराधार असल्याचे म्हटले. राहुल गांधी यांनी हा आरोप बिर्ला यांच्या त्या सल्ल्यानंतर केला, ज्यात त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी नियमांचे पालन करण्यास सांगितले होते. लोकसभा अध्यक्षांनी ही टिप्पणी का केली हे कळू शकले नाही. राहुल म्हणाले, ‘अध्यक्षांनी माझ्याविषयी टिप्पणी केली आणि बोलण्याची संधी न देताच सभागृह तहकूब केले. ते माझ्याविषयीच राहुलबोलत होते आणि मला माहीत नाही ते काय म्हणाले.’ राहुल म्हणाले, ‘मला मागील आठवड्यात म्हणायचे होते की, कुंभचे आयोजन चांगले झाले. मी बेरोजगारीवरही बोलू इच्छित होतो. परंतु मला बोलू दिले नाही. मला माहीत नाही की, अध्यक्ष काय विचार करत आहेत किंवा त्यांचा काय दृष्टिकोण आहे. मात्र सत्य हे आहे की, मला बोलू दिले जात नाही.’ या घटनाक्रमानंतर लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई, पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि लोकसभेतील पक्षाचे प्रतोद मणिकम टागोरसह ७० काँग्रेस खासदारांनी अध्यक्षांसमक्ष काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बोलू दिले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. काय म्हणाले बिर्ला : विरोधी पक्षनेत्यांनी प्रतिष्ठा राखावी अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले होते की, ‘सर्व सदस्यांकडून अपेक्षा आहे की, त्यांनी सभागृहाचे उच्च मानक आणि प्रतिष्ठा राखावी. माझ्या अनेक गोष्टी लक्षात आल्या आहेत. विरोधी पक्षनेत्यांकडून अपेक्षा करतो की ते नियम ३४९ नुसार वागतील, जो सभागृह सदस्यांद्वारे पालन करावयाच्या नियमाशी संबंधित आहे.