मनमोहन सिंग- सरन्यायाधीशांची भेट सार्वजनिक कार्यक्रमात:चुकीचे लंगडे समर्थन करू नका; काँग्रेसच्या मदतीसाठी जितेंद्र आव्हाडांची पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपतीच्या आरतीसाठी गेले होते. त्याची चर्चा सध्या सुरू आहे. यावर आघाडीतील नेत्यांनी टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पलटवार केला होता. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग स्वतःच्या घरी इफ्तार पार्टी करत असताना सरन्यायाधीश उपस्थित राहत असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र आता काँग्रेसवर करण्यात आलेल्या आरोपांवर मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड पुढे आले आहेत. मनमोहन सिंग तत्कालीन सरन्यायाधीशांची भेट घरगुती नव्हती तर सार्वजनिक कार्यक्रमातली होती, असा दावा आव्हाड यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार आव्हाड यांनी भाजपच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेला प्रत्युत्तर देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. काँग्रेसच्या वतीने त्यांनीच भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. मनमोहन सिंग यांच्यासोबत कार्यक्रमात आणखी कोण कोण सहभागी झाले होते याची माहिती त्यांनी दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या संबंधीचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. यामध्ये भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, सिताराम येचुरी, लालूप्रसाद यादव, राहुल गांधी यांचे देखील फोटो आहेत.
आमदार जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट देखील पहा…. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘सध्या तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन यांचे सार्वजनिक कार्यक्रमातील फोटो वायरल होत आहेत. ते फोटो यासाठी वायरल होताहेत की, सरन्यायाधीश पंतप्रधान यांची मुलाखत ही आश्चर्यकारक नसते किंवा धक्कादायकही नसते. पण, यातील फरक एवढाच आहे की, तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन आणि तत्कालीन डाॅ. मनमोहन सिंह हे एका सार्वजनिक कार्यक्रमात भेटलेले दिसतात. त्या कार्यक्रमाला लालकृष्ण अडवाणी, राहुल गांधी, सीताराम येच्युरी असे अनेक नेते आजूबाजूला दिसतात. म्हणजेच हा एक सार्वजनिक कार्यक्रम असावा; ज्यामध्ये देशातील प्रमुख नेते आणि व्यक्तींना बोलावले गेलेले असेल. ही एकांतात किंवा घरात झालेली भेट नसून एका प्रांगणात झालेली भेट, असेच या भेटीचे वर्णन करता येईल. तेव्हा झालेल्या चुकीचे असे लंगडं समर्थन करू नका.’ राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… देवेंद्र फडणवीसांकडून भाजप नेत्यांना विजयाची त्रिसूत्री:मतदार संघात राहा, कामे मार्गी लावा, युतीविषयी बोलू नका; मागे उभा असल्याचेही आश्वासन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणाऱ्या नेत्यांची संख्या देखील वाढली आहे. गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी नेत्यांच्या रांगा लागल्या आहेत. या सर्व नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून फडणवीस हे कानमंत्र देत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. आपापल्या मतदारसंघात कामाला लागा, महायुतीतील नेत्यांच्या विरोधात अपशब्द वापरणे टाळा, असा सल्ला फडणवीस यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला आहे. पूर्ण बातमी वाचा… राहुल गांधी सत्तेत आले तर आरक्षण जाणार, हे स्पष्ट:आरक्षणाच्या मुद्यावरुन भाजपचा आक्रमक पवित्रा; आज राज्यभरात आंदोलन राहुल गांधी सत्तेत आले तर आरक्षण जाणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आम्ही सर्व समाजामध्ये जाऊन समाजप्रबोधन करणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलन करण्याचा निर्णय भाजपच्या वतीने घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. पूर्ण बातमी वाचा… काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का:आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता; नितीन गडकरींची भेट घेतल्याने चर्चा वाढली आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अनेक राजकीय पक्षांनी आपापली तयारी देखील सुरू केली आहे. त्यातच या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून या पक्षात येणाऱ्या इच्छुकांची संख्या देखील वाढली आहे. त्यातच आता काँग्रेसला भाजप आणखी एक धक्का देणार असल्याचे समोर आले आहे. नांदेड दक्षिण मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पूर्ण बातमी वाचा…

​पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपतीच्या आरतीसाठी गेले होते. त्याची चर्चा सध्या सुरू आहे. यावर आघाडीतील नेत्यांनी टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पलटवार केला होता. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग स्वतःच्या घरी इफ्तार पार्टी करत असताना सरन्यायाधीश उपस्थित राहत असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र आता काँग्रेसवर करण्यात आलेल्या आरोपांवर मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड पुढे आले आहेत. मनमोहन सिंग तत्कालीन सरन्यायाधीशांची भेट घरगुती नव्हती तर सार्वजनिक कार्यक्रमातली होती, असा दावा आव्हाड यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार आव्हाड यांनी भाजपच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेला प्रत्युत्तर देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. काँग्रेसच्या वतीने त्यांनीच भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. मनमोहन सिंग यांच्यासोबत कार्यक्रमात आणखी कोण कोण सहभागी झाले होते याची माहिती त्यांनी दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या संबंधीचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. यामध्ये भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, सिताराम येचुरी, लालूप्रसाद यादव, राहुल गांधी यांचे देखील फोटो आहेत.
आमदार जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट देखील पहा…. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘सध्या तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन यांचे सार्वजनिक कार्यक्रमातील फोटो वायरल होत आहेत. ते फोटो यासाठी वायरल होताहेत की, सरन्यायाधीश पंतप्रधान यांची मुलाखत ही आश्चर्यकारक नसते किंवा धक्कादायकही नसते. पण, यातील फरक एवढाच आहे की, तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन आणि तत्कालीन डाॅ. मनमोहन सिंह हे एका सार्वजनिक कार्यक्रमात भेटलेले दिसतात. त्या कार्यक्रमाला लालकृष्ण अडवाणी, राहुल गांधी, सीताराम येच्युरी असे अनेक नेते आजूबाजूला दिसतात. म्हणजेच हा एक सार्वजनिक कार्यक्रम असावा; ज्यामध्ये देशातील प्रमुख नेते आणि व्यक्तींना बोलावले गेलेले असेल. ही एकांतात किंवा घरात झालेली भेट नसून एका प्रांगणात झालेली भेट, असेच या भेटीचे वर्णन करता येईल. तेव्हा झालेल्या चुकीचे असे लंगडं समर्थन करू नका.’ राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… देवेंद्र फडणवीसांकडून भाजप नेत्यांना विजयाची त्रिसूत्री:मतदार संघात राहा, कामे मार्गी लावा, युतीविषयी बोलू नका; मागे उभा असल्याचेही आश्वासन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणाऱ्या नेत्यांची संख्या देखील वाढली आहे. गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी नेत्यांच्या रांगा लागल्या आहेत. या सर्व नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून फडणवीस हे कानमंत्र देत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. आपापल्या मतदारसंघात कामाला लागा, महायुतीतील नेत्यांच्या विरोधात अपशब्द वापरणे टाळा, असा सल्ला फडणवीस यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला आहे. पूर्ण बातमी वाचा… राहुल गांधी सत्तेत आले तर आरक्षण जाणार, हे स्पष्ट:आरक्षणाच्या मुद्यावरुन भाजपचा आक्रमक पवित्रा; आज राज्यभरात आंदोलन राहुल गांधी सत्तेत आले तर आरक्षण जाणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आम्ही सर्व समाजामध्ये जाऊन समाजप्रबोधन करणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलन करण्याचा निर्णय भाजपच्या वतीने घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. पूर्ण बातमी वाचा… काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का:आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता; नितीन गडकरींची भेट घेतल्याने चर्चा वाढली आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अनेक राजकीय पक्षांनी आपापली तयारी देखील सुरू केली आहे. त्यातच या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून या पक्षात येणाऱ्या इच्छुकांची संख्या देखील वाढली आहे. त्यातच आता काँग्रेसला भाजप आणखी एक धक्का देणार असल्याचे समोर आले आहे. नांदेड दक्षिण मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पूर्ण बातमी वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment