मृत्यूच्या आधीचे जय कोणासोबत होता? त्याला कुठे-कुठे नेण्यात आले?:सर्वांचे कॉल डिटेल चेक करण्याची मिटकरींची मागणी

मृत्यूच्या आधीचे जय कोणासोबत होता? त्याला कुठे-कुठे नेण्यात आले?:सर्वांचे कॉल डिटेल चेक करण्याची मिटकरींची मागणी

मनसे कार्यकर्ते जय मालोकरच्या मृत्यूप्रकरणी आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. मृत्यूच्या आधीचे जय नेमका कोणासोबत होता? त्याला कुठे कुठे नेण्यात आले? त्याच्यासोबतच्या सर्वांचे कॉल डिटेल चेक करा आणि ते न्यायला द्या, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. अमोल मिटकरी यांनी आधी देखील या प्रकरणात मनसे नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता हा वाद पुन्हा एकदा वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर काही वेळातच जय मालोकर या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र या प्रकरणी अमोल मिटकरी यांच्याकडून मनसे नेत्यांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. अजित पवार विरुद्ध राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये यामुळे चांगलाच वाद पेटला होता. आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने नव्हे तर त्याला झालेल्या मारहाणीमुळे झाल्याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली आहे. यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या घटनेनंतर जय मालोकर याला मारहाण करण्यात आली होती. याच मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जय मालोकर याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा खोटा होता का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काय म्हणतो पोस्टमार्टम रिपोर्ट? जयला जबर मारहाण झाली. पाठीवर छातीवर डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण. छातीच्या चार ते पाच बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर आहेत. डोक्याला सुद्धा गंभीर मारहाण झाली आहे. पोस्टमार्टमवेळी मेंदूवर मोठ्या प्रमाणात सूज. त्यामुळे मेंदूचे वजन वाढलं. मानेवर जबर मारहाणीमुळे त्याच्या मज्जातंतूना गंभीर इजा. या सर्व गोष्टींमुळे ‘न्यूरोजनिक शॉक’मुळे मृत्यू. असे या अहवालात म्हणले आहे. नेमके प्रकरण काय? अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणे भरल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी प्रत्युत्तर देत म्हणाले होते, राज ठाकरे टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या ‘सुपारीबहाद्दरां’नी अजित पवारांवर बोलू नये. कुठल्याही आंदोलनाला ते यशस्वी करू शकले नाहीत. राज ठाकरेंची विश्वासार्हता संपली आहे, असा टोला आमदार मिटकरी यांनी लगावला होता. या टीकेमुळे मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले. यातून अमोल मिटकरी यांच्या वाहनाची 30 जुलै रोजी तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती. या प्रकरणात पोलिसांनी मनसेच्या 13 पदाधिकाऱ्यांना व मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यामुळे मनसैनिक जय मालोकर प्रचंड तणावात होता. या दबावातूनच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. असे सांगण्यात आले होते. मात्र आता मिळालेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून त्याचा मृत्यू मारहाण झाल्यामुळे झाला असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता त्याला मारहाण झाली होती तर ही मारहाण कोणी केली होती? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, अकोला दौऱ्यात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जय मालोकर यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली होती.

​मनसे कार्यकर्ते जय मालोकरच्या मृत्यूप्रकरणी आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. मृत्यूच्या आधीचे जय नेमका कोणासोबत होता? त्याला कुठे कुठे नेण्यात आले? त्याच्यासोबतच्या सर्वांचे कॉल डिटेल चेक करा आणि ते न्यायला द्या, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. अमोल मिटकरी यांनी आधी देखील या प्रकरणात मनसे नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता हा वाद पुन्हा एकदा वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर काही वेळातच जय मालोकर या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र या प्रकरणी अमोल मिटकरी यांच्याकडून मनसे नेत्यांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. अजित पवार विरुद्ध राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये यामुळे चांगलाच वाद पेटला होता. आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने नव्हे तर त्याला झालेल्या मारहाणीमुळे झाल्याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली आहे. यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या घटनेनंतर जय मालोकर याला मारहाण करण्यात आली होती. याच मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जय मालोकर याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा खोटा होता का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काय म्हणतो पोस्टमार्टम रिपोर्ट? जयला जबर मारहाण झाली. पाठीवर छातीवर डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण. छातीच्या चार ते पाच बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर आहेत. डोक्याला सुद्धा गंभीर मारहाण झाली आहे. पोस्टमार्टमवेळी मेंदूवर मोठ्या प्रमाणात सूज. त्यामुळे मेंदूचे वजन वाढलं. मानेवर जबर मारहाणीमुळे त्याच्या मज्जातंतूना गंभीर इजा. या सर्व गोष्टींमुळे ‘न्यूरोजनिक शॉक’मुळे मृत्यू. असे या अहवालात म्हणले आहे. नेमके प्रकरण काय? अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणे भरल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी प्रत्युत्तर देत म्हणाले होते, राज ठाकरे टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या ‘सुपारीबहाद्दरां’नी अजित पवारांवर बोलू नये. कुठल्याही आंदोलनाला ते यशस्वी करू शकले नाहीत. राज ठाकरेंची विश्वासार्हता संपली आहे, असा टोला आमदार मिटकरी यांनी लगावला होता. या टीकेमुळे मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले. यातून अमोल मिटकरी यांच्या वाहनाची 30 जुलै रोजी तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती. या प्रकरणात पोलिसांनी मनसेच्या 13 पदाधिकाऱ्यांना व मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यामुळे मनसैनिक जय मालोकर प्रचंड तणावात होता. या दबावातूनच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. असे सांगण्यात आले होते. मात्र आता मिळालेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून त्याचा मृत्यू मारहाण झाल्यामुळे झाला असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता त्याला मारहाण झाली होती तर ही मारहाण कोणी केली होती? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, अकोला दौऱ्यात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जय मालोकर यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली होती.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment