मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातून धक्कादायक घटना समोर:रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने आमदाराच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातून धक्कादायक घटना समोर:रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने आमदाराच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

मुंबई आकाशवाणी आमदार निवासातून आता पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. आमदार निवासात मुक्कामाला असलेल्या कार्यकर्त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रुग्णाला वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे सदरील प्रकरणात रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचा दावा आता केला जात आहे. मात्र, या प्रकरणात मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. मंत्रालयात असलेल्या आकाशवाणी आमदार निवासात एका कार्यकर्त्यांना सोमवारी रात्री साडेबारा वाजता हृदय विकाराचा झटका आला. त्यामुळे तात्काळ ॲम्बुलन्स बोलावण्यात आली. पण ॲम्बुलन्स वेळेवर पोहोचली नसल्याने सदरील रुग्णाचा मृत्यू झाला. सदरील रुग्ण हा आकाशवाणी आमदार निवासातील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या रूम नंबर 408 मध्ये राहत होता. रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने अखेर नातेवाईकांना नाईलाजाने पोलिसांना फोन करावा लागला. अखेर पोलिसांच्या व्हॅनमध्ये रुग्णाला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने मृत्यू झाला सोलापूरचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या रूम नंबर 408 मध्ये त्यांचे कार्यकर्ते चंद्रकांत धोत्रे हे मुक्कामाला होते. ते एका बैठकीसाठी मुंबईत आले होते. त्यासाठी ते आमदार देशमुख यांच्या आकाशवाणी आमदार निवासातील रूम क्रमांक 408 मध्ये मुक्काम केला. मात्र सोमवारी रात्री अचानक त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवला. त्यामुळे रुग्णवाहिका बोलावण्यात आले. मात्र ती वेळेवर न पोहोचल्याने तसेच वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. आमदार संतोष बांगर यांच्या रुममध्ये आगीची घटना दोन महिन्यांपूर्वीच याच आमदार निवासाला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मंत्रालयाच्या मागील बाजूस असलेल्या आकाशवाणी आमदार निवासाला ही आग लागली होती. हिंगोली जिल्ह्यातील आमदार संतोष बांगर यांच्या रूममध्ये ही घटना घडल्याची माहिती समोर आली होती. या संदर्भात आमदार निवासाचे फायर ऑडिट झाले नसल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला होता.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment