मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था ढासाळतेय:शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा; गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन
मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आता किती ढासळत आहे, याचे हे लक्षण आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, कारण त्यांच्याकडेच गृहखाते असल्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. मुंबईमध्ये अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यावरून महायुती सरकारवर सर्वच विरोधी पक्षांनी टीका केली आहे. यात शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना शरद पवार हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था किती ढासाळत आहे, याचे हे लक्षण आहे. त्यामुळे वाईट याच गोष्टीचा वाटते. मध्यंतरीच्या काळात याच भागात एक हत्या देखील झाली होती. आणि आता हा दुसरा हल्ला असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. या सर्व गोष्टी चिंताजनक असल्याचे देखील ते म्हणाले. राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघण्याची आवश्यकता शरद पवार यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांकडे गृहविभागाचा कारभार असल्यामुळे त्यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन देखील शरद पवार यांनी केले आहे. नेमके प्रकरण काय? बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी रात्री अडीच वाजता मुंबईतील खार येथील त्याच्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला. सैफच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि डोक्यावर चाकू आहे. सैफला रात्री 3.30 वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. लीलावती हॉस्पिटलचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी सांगतात की, सैफवर सहा वेळा वार करण्यात आले होते. त्यातील दोन जखमा खोल आहेत. पाठीच्या कण्याजवळ एक जखम आहे. तीन जणांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले हल्ल्याच्या वेळी कुटुंबातील इतर सदस्य कुठे होते याची माहिती सध्या तरी उपलब्ध नाही. करिश्मा कपूरने 9 तासांपूर्वी इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. तिने बहीण करिना, मैत्रिण रिया आणि सोनम कपूरसोबत पार्टी केली. तिघींनी एकत्र जेवण केले. करिनाने बहीण करिश्माची ही पोस्ट तिच्या अकाउंटवर पुन्हा पोस्ट केली होती. सध्या मुंबई पोलिसांनी सैफच्या घरातून तीन जणांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले आहे. संजय राऊत यांनीही केली टीका राज्यातील 90 टक्के पोलिस फुटलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. मुंबईपासून बीडपर्यंत कुठेही कोणीची सुरक्षित नाही. राज्यात कायदा-सुव्यवस्था दिसून येत नाही, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातील सरकार हे सभा, मेळाव्यामध्ये व्यस्त आहे. राज्यात काय सुरू आहे याचा गृहमंत्र्यांनी विचार करायला हवा. महायुतीचा मेळावा जर नौदलाच्या सभागृहात झाला असेल ही गोष्ट गंभीर आहे. नौदलाच्या जागेत आम्हाला मेळावा घेण्याची संधी मिळेल का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यातील या संबंधीत इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… खासदार सुप्रिया सुळेंचा तातडीने सैफ अली खान यांच्या कुटुंबियांना फोन:काही मदत करू शकत असेल तर… कुटुंबीयांना दिला दिलासा सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवारी रात्री राहत्या घरी एका धारदार शस्त्राने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सैफ अली खान याला गंभीर दुखापत देखील झाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमातून तातडीने सैफ अली खान यांच्या कुटुंबियांना फोन केला. मी काही मदत करू शकत असेल तर मला सांगा, मी लगेचच मदत करेल, असा दिलासा सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खान यांच्या कुटुंबीयांना दिला आहे. पूर्ण बातमी वाचा… मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे:खासदार वर्षा गायकवाड संतापल्या; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर फडणवीसांवर टीका महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अशा घटना वाढत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. या माध्यमातून वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्रातील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबईत हे सर्व सुरू असताना मुंबई पोलिस, आयुक्त आणि पोलिस महासंचालक काय काम करत आहेत? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. पूर्ण बातमी वाचा…