नरेंद्र मोदी मोठ्या घोषणा करतात, तेव्हा सर्वसामान्यांच्या पोटात गोळा येतो:अर्थसंकल्प सादर होण्याआधीच संजय राऊत यांचा निशाणा
नरेंद्र मोदी जेव्हा मोठ्या घोषणा करतात, त्यावेळी सर्वसामान्य व्यक्तींच्या पोटात गोळा येतो, असा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या आधीच संजय राऊत यांनी अर्थसंकल्पातील घोषणेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या सर्व घोषणा या गौतम अदानी यांच्यासारख्या मित्रांसाठी असतात, अशा शब्दात राऊत यांनी निशाणा साधला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सर्वसामान्य आणि मध्यमवर्ग यांच्यासाठी अजिबात नाही. देशातील 85 कोटी नागरिकांना मोफत धान्य देणे, हे अर्थव्यवस्था चांगली असल्याचे लक्षण नाही. मोदी जेव्हा घोषणा करतात तेव्हा सर्वसामान्यांच्या पोटात गोळा येत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अर्थव्यवस्था बिघडणाऱ्या योजनाच या सरकारने आतापर्यंत आणल्या असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. गेल्या दहा वर्षात लक्ष्मी प्रसन्न झाली असेल तर ती केवळ मोदींचे मित्र गौतम अदानी यांनाच झाली आहे. त्यामुळे या देशात सर्वात गरीब हे गौतम आदीनीच आहेत. आणि लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न व्हावी, यासाठी देशाचा अर्थसंकल्प राबवला जात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राष्ट्रपतींना पुअर लेडी म्हणणे चूक नाही – राऊत काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी राष्ट्रपदींचा उल्लेख करताना त्यांना पुअर लेडी म्हटले होते. या संदर्भात राऊत म्हणाले की, सोनिया गांधी काय बोलल्या आणि कोणत्या संदर्भात बोलल्या हे पाहणं महत्त्वाचे आहे. त्यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही. वास्तविक देशाच्या राष्ट्रपती पदावर एखादी पुअर लेडी बसली असेल तर ते कौतुकास्पद आहे. सामान्य घरातील, गरीब घरातील स्त्रिया देशाच्या राष्ट्रपती झाल्या आणि त्यांना जर पुअर म्हणले असेल तर त्यात मला काही चुकीचे वाटत नाही. सामान्य माणसाला सर्वोच्च पदी बसवण्याची किंवा ते बसले असतील. दुसरे म्हणजे दबावाखाली असलेली व्यक्ती सर्वोच्च पदावर असेल तर त्यांना पुअर मॅन किंवा पुअर लेडी म्हटले जाते. अर्थात त्यांची प्रकृती देखील पुअर दिसत असेल. प्रत्येक शब्दाचा अर्थ काढून विरोधी पक्षावर शंका घेणे चुकीचे असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. लटकती आणि भटकती आत्मा, हा काय प्रकार आहे? वास्तविक अशा अनेक शब्दांचा वापर नरेंद्र मोदी यांनीच केला आहे. लटकती आणि भटकती आत्मा, हा काय प्रकार आहे? असे शब्द नरेंद्र मोदी यांनी काढले होते. उद्धव ठाकरे यांना नकली संतान भाजपवाले म्हणाले होते. तसाच पुअर लेडी असा उल्लेख केला गेला आहे. पुअर लेडी हा शब्द असंसदीय नाही, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. ही भाषा आणि हे शब्दरत्न उधळायला सुरुवात भारतीय जनता पक्षानेच केली असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. राष्ट्रपतींचा सन्मान राखला पाहिजे. मात्र, हा शब्द म्हणजे त्यांचा अपमान नाही, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा… राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागायला हवा:संजय राऊतांची खोचक टीका; तर नगर विकास खात्यावरुन शिंदेना इशारा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागायला हवा, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे. राज ठाकरे यांना ईव्हीएम घोटाळ्या संदर्भात काही प्रश्न असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारायला हवेत. तसेच त्या दोघातील हा संवाद सर्वसामान्य जनतेसमोर लाईव्ह करायला हवा. त्यामुळे सामान्य व्यक्तीच्या मनातील असलेली अनेक जाळमटे दूर होतील, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील राऊत यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यासंदर्भात लवकरच काही प्रकरणे आपण समोर आणणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. पूर्ण बातमी वाचा…