नॅशनल हेराल्ड प्रकरण, कोर्टात सुनावणी सुरू:सोनियांनी मुलाच्या लाभासाठीच अध्यक्षपदाचा दुरुपयोग केला

नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने आरोप केला की, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी यंग इंडियन कंपनीच्या माध्यमातून स्वतःचा मुलगा राहुल गांधीं यांना लाभ पोहोचवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षपदाचा ‘दुरुपयोग’ केला. बुधवारी नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीच्या आरोपपत्रावर राऊस अव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. ईडीकडून विशेष सरकारी वकील जोहेब हुसेन म्हणाले की, या प्रकरणात सोनिया व राहुल यांनी १४२ कोटींची ‘बेकायदेशीर कमाई’ केली. भाड्यातून मिळणारे हे उत्पन्न गांधी कुटुंबाच्या ‘यंग इंडियन’ कंपनीला जात असे. त्यातील ७६% शेअर्स सोनिया व राहुल यांच्या मालकीचे आहेत. एजन्सीचा आरोप आहे की यंग इंडियनला २०१७-१८ मध्ये १८.१२ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या, जी एक ‘ॲडजस्टमेंट एंट्री’ होती. एजेएलला कोणताही वैध भाडे करार नसताना ₹३८.४१ कोटींचे बनावट आगाऊ भाडे आढळले. काँग्रेस नेत्यांच्या सूचनेवरून हे पैसे गोळा करण्यात आल्याचा दावा ईडीने केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment