नातवाकडून आजीला कामाला जा सांगितल्याच्या रागातून बेल्टने मारहाण:पुण्याच्या लाेणीकाळभाेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नातवाकडून आजीला कामाला जा सांगितल्याच्या रागातून बेल्टने मारहाण:पुण्याच्या लाेणीकाळभाेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

लाेणीकाळभाेर परिसरात रहाणाऱ्या एका कुटुंबातील 72 वर्षीय आजीने तिच्या नातवास घरी असताना, तु दुकानात कामाला जात जात, घरी बसत जाऊ नकाे असे सांगितले. त्याचा राग आल्याने नातवाने कमरेच्या बेल्टने आजीस छातीवर, पाठीवर व पायावर बेदम मारहाण करत दुखापत केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी लाेणीकाळभाेर पोलिस ठाण्यात आजीने नातू ओंकार संजय जाेशी याच्या विराेधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी नातवावर भान्यास 118 (2) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. सावत्र मुलाकडून आईस मारहाण येरवडा परिसरात रहाणाऱ्या एका कुटउंबातील सावत्र मुलगा सावत्र आईच्या घरी येऊन त्याने तिला शिवीगाळ करुन पाणी पिण्याचे तांब्या, लाेखंडी अँगल, ग्लास व लाथाने मारहाण करुन दुखापत केल्याचा प्रकार घडला आहे. तसेच याबाबत पोलिसत तक्रार केली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रिटा अन्थनी जाेसेफ (वय-40) यांनी सावत्र मुलगा मजहर जुबेर खान (25) याचे विराेधात येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास येरवडा पोलिस करत आहे. नातेवाईकाकडून तरुणास मारहाण पांडवनगर येथील हेल्थ कॅम्प याठिकाणी 32 वर्षीय एक तरुण त्याचे राहते घराचे समाेर त्याची आई व इतर महिलांची किरकाेळ भांडणे साेडविण्यास गेला हाेता. त्याचा राग मनात धरुन तरुणाचा नातेवाईक अंकुश रामु ददली (रा.डांगे चाैक,पुणे) याने तक्रारदार मनाेज शंकर ददली (वय-32) याच्या मानेवर व पाठीवर वीटेचे तुकडे फेकून मारुन त्यास जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आराेपीवर चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​लाेणीकाळभाेर परिसरात रहाणाऱ्या एका कुटुंबातील 72 वर्षीय आजीने तिच्या नातवास घरी असताना, तु दुकानात कामाला जात जात, घरी बसत जाऊ नकाे असे सांगितले. त्याचा राग आल्याने नातवाने कमरेच्या बेल्टने आजीस छातीवर, पाठीवर व पायावर बेदम मारहाण करत दुखापत केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी लाेणीकाळभाेर पोलिस ठाण्यात आजीने नातू ओंकार संजय जाेशी याच्या विराेधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी नातवावर भान्यास 118 (2) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. सावत्र मुलाकडून आईस मारहाण येरवडा परिसरात रहाणाऱ्या एका कुटउंबातील सावत्र मुलगा सावत्र आईच्या घरी येऊन त्याने तिला शिवीगाळ करुन पाणी पिण्याचे तांब्या, लाेखंडी अँगल, ग्लास व लाथाने मारहाण करुन दुखापत केल्याचा प्रकार घडला आहे. तसेच याबाबत पोलिसत तक्रार केली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रिटा अन्थनी जाेसेफ (वय-40) यांनी सावत्र मुलगा मजहर जुबेर खान (25) याचे विराेधात येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास येरवडा पोलिस करत आहे. नातेवाईकाकडून तरुणास मारहाण पांडवनगर येथील हेल्थ कॅम्प याठिकाणी 32 वर्षीय एक तरुण त्याचे राहते घराचे समाेर त्याची आई व इतर महिलांची किरकाेळ भांडणे साेडविण्यास गेला हाेता. त्याचा राग मनात धरुन तरुणाचा नातेवाईक अंकुश रामु ददली (रा.डांगे चाैक,पुणे) याने तक्रारदार मनाेज शंकर ददली (वय-32) याच्या मानेवर व पाठीवर वीटेचे तुकडे फेकून मारुन त्यास जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आराेपीवर चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment