चारा उगवण्याचा नवा प्रयोग करजगावात शेतकऱ्यांना मोफत पुरवठा:सरकारी जमीनीवर जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम

चारा उगवण्याचा नवा प्रयोग करजगावात शेतकऱ्यांना मोफत पुरवठा:सरकारी जमीनीवर जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम

सरकारी जमीनीवर चारा उगवून तो शेतकऱ्यांना मोफत वितरित करण्याचा उपक्रम वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनने सुरु केला आहे. मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे यांच्या पुढाकाराने हा प्रयोग चांदूरबाजार पंचायत समिती अंतर्गत परतवाडानजिकच्या करजगाव येथे सुरु करण्यात आला असून तेथे उगवलेला चारा शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्य शासनाने पूर्व विदर्भातील नागपुर आणि पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांसह राज्यातील एकूण १४ जिल्हे अतिचिंताग्रस्त म्हणून घोषित केले आहे. पुढे त्याच जिल्ह्यांसाठी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. त्या १४ जिल्ह्यांपैकी हिरवा चारा उगवून तो शेतकऱ्यांना वितरित करण्याचा प्रयोग प्रत्यक्षात सुरु होणारा हा पहिलाच जिल्हा आहे. शेतकऱ्यांना शेतीमधून हवे तेवढे उत्पन्न मिळत नाही. सततची नापिकी आणि शेतमालाचे पडलेले भाव यामुळेही त्यांना बरेचदा हताश-निराश व्हावे लागते. त्यामुळे काही शेतकरी थेट आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. परिणामी शासनाने पश्चिम विदर्भातील पाच, पूर्व विदर्भातील वर्धा आणि मराठवाड्यातील इतर काही जिल्हे मिळून १४ जिल्ह्यांसाठी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली आहे. या मिशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोचविण्यात येत आहेत. सरकारी जमीनीवर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन करुन तो चारा शेतकऱ्यांना मोफत पुरविणे, ही त्यापैकीच एक योजना आहे. यावेळी हेलोंडे यांच्याशिवाय करजगावच्या सरपंच इंदिराबाई वानखडे, पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक उपायुक्त संजय कावरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके, बीडीओ नारायण अमझरे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी निलेश ठोंबरे, मिशनचे जनसंपर्क अधिकारी प्रमोद कापडे आदी मान्यवरांसह गोपालक व शेतकरी उपस्थित होते. यांचा झाला सत्कार यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. मिलींद राऊत, रोजगार सेवक प्रवीण वैश्य, सहायक तांत्रिक अधिकारी ढवळे, तांत्रिक सहायक मंगेश वानखडे, हिरव्या चाऱ्याची राखण करणारे गजानन शिरभाते यांचा त्यांच्या योगदानाबद्दल मिशनचे अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment