गणेशोत्सवावरही मराठा आंदोलनाचा प्रभाव:पुण्यात बाप्पांपुढे मनोज जरांगेंच्या उपोषणाचा देखावा, पाहा लक्षवेधक VIDEO

गणेशोत्सवावरही मराठा आंदोलनाचा प्रभाव:पुण्यात बाप्पांपुढे मनोज जरांगेंच्या उपोषणाचा देखावा, पाहा लक्षवेधक VIDEO

गणपतीचे आगमन झाल्यावर अनेक ठिकाणी विविध प्रकारचे आकर्षक देखावे आपल्याला पाहायला मिळतात. या देखाव्यांमधून सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न केला जातो. असाच काहीसा देखावा पुण्यातील शौर्य किरण चव्हाण यांनी त्यांच्या गणपतीसमोर केला आहे. या देखाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मराठा नेते मनोज जरांगे पाटील आहेत. या देखाव्याच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण लाभो असे साकडे गणरायाकडे घालण्यात आल्याचे शौर्य किरण चव्हाण यांनी सांगितले आहे. पुण्यातील 93 गुरुवार पेठ, पंचमुखी मारुती मंदिर परिसरात शौर्य किरण चव्हाण यांनी त्यांच्या घरी हा देखावा सादर केला आहे. यावर बोलताना चव्हाण म्हणाले, यंदाचा देखावा हा मराठा आरक्षणावर आधारीत असून ही संकल्पना साकार करण्याचे कारण असे की देखानव्याच्या माध्यमातून श्री गणरायाला साकडे घालून सामान्य मराठा समाजाला आरक्षण लाभो ही मागणी गणरायाच्या चरणी ठेऊन ही संकल्पना यंदाच्या वर्षी साकार केली आहे. चव्हाण यांनी सादर केलेल्या या देखाव्याला पाहण्यासाठी येथील नागरिकही मोठ्या संख्येने येत असल्याचे दिसते. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी गेल्या वर्षीपासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी केलेल्या उपोषणाला तसेच आंदोलनांना संपूर्ण राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा पाठिंबा मिळत आहे. संपूर्ण मराठा समाजच त्यांच्या पाठीशी आहे, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. आता पुन्हा एकदा मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. या मागण्या दिलेल्या तारखेपूर्वी पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. खाली पाहा व्हिडिओ

​गणपतीचे आगमन झाल्यावर अनेक ठिकाणी विविध प्रकारचे आकर्षक देखावे आपल्याला पाहायला मिळतात. या देखाव्यांमधून सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न केला जातो. असाच काहीसा देखावा पुण्यातील शौर्य किरण चव्हाण यांनी त्यांच्या गणपतीसमोर केला आहे. या देखाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मराठा नेते मनोज जरांगे पाटील आहेत. या देखाव्याच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण लाभो असे साकडे गणरायाकडे घालण्यात आल्याचे शौर्य किरण चव्हाण यांनी सांगितले आहे. पुण्यातील 93 गुरुवार पेठ, पंचमुखी मारुती मंदिर परिसरात शौर्य किरण चव्हाण यांनी त्यांच्या घरी हा देखावा सादर केला आहे. यावर बोलताना चव्हाण म्हणाले, यंदाचा देखावा हा मराठा आरक्षणावर आधारीत असून ही संकल्पना साकार करण्याचे कारण असे की देखानव्याच्या माध्यमातून श्री गणरायाला साकडे घालून सामान्य मराठा समाजाला आरक्षण लाभो ही मागणी गणरायाच्या चरणी ठेऊन ही संकल्पना यंदाच्या वर्षी साकार केली आहे. चव्हाण यांनी सादर केलेल्या या देखाव्याला पाहण्यासाठी येथील नागरिकही मोठ्या संख्येने येत असल्याचे दिसते. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी गेल्या वर्षीपासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी केलेल्या उपोषणाला तसेच आंदोलनांना संपूर्ण राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा पाठिंबा मिळत आहे. संपूर्ण मराठा समाजच त्यांच्या पाठीशी आहे, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. आता पुन्हा एकदा मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. या मागण्या दिलेल्या तारखेपूर्वी पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. खाली पाहा व्हिडिओ  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment