गुजरातमध्ये रॅगिंग, MBBS च्या विद्यार्थ्याचा मृत्यू:कुटुंबीय म्हणाले – अशी मानसिकता असलेले लोक डॉक्टर कसे होऊ शकतात?

गुजरातमधील पाटण जिल्ह्यात रॅगिंगमुळे एका विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी धारपूर मेडिकल कॉलेजच्या १५ ज्येष्ठ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांना कॉलेजमधून निलंबितही करण्यात आले आहे. सोमवारी पोलिसांनी सर्वांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने 1 दिवसाची कोठडी मंजूर केली आहे. आज पोलिस पुन्हा आरोपी विद्यार्थ्यांना न्यायालयात हजर करणार असून रिमांडची मुदत वाढवण्याची मागणी करणार आहेत. कुटुंबीयांनी जन्मठेपेची मागणी केली अनिल मेथानिया हा धारपूर...

विक्रांत मॅसीला मोहन यादव म्हणाले- तुम्ही चांगला चित्रपट बनवला:आज कॅबिनेटसोबत चित्रपट पाहायला जाणार, साबरमती रिपोर्टचा मुख्य अभिनेता आहे विक्रांत

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आज (20 नोव्हेंबर) संध्याकाळी अशोका लेक व्ह्यू येथे त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि आमदारांसह ‘द साबरमती रिपोर्ट’ हा बॉलीवूड चित्रपट पाहणार आहेत. तत्पूर्वी सकाळी मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाचा मुख्य अभिनेता विक्रांत मॅसी याच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. यादरम्यान डॉ.यादव यांनी मॅसीच्या उत्कृष्ट अभिनयाबद्दल त्याचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, आम्ही मध्य प्रदेशातही हा चित्रपट करमुक्त केला आहे....

नांदगावात पैसे वाटप करणारी गाडी पकडली:अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्याने गाडीवर चढत नोटा फाडल्या, पोलिसांकडून वाहन जप्त

नांदगावात पैसे वाटप करणारी गाडी पकडली:अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्याने गाडीवर चढत नोटा फाडल्या, पोलिसांकडून वाहन जप्त

नांदगाव मतदारसंघात सकाळी सुहास कांदे आणि समीर भुजबळ कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदगाव मतदारसंघातील साकोरा येथे पैसे वाटप करणारी गाडी पकडली आहे. अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी पकडली आहे. गाडी पकडल्यानंतर एका कार्यकर्त्याने गाडीच्या टपावर चढून नोटा फाडल्या आणि उधळल्या. मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव मतदारसंघातील साकोरा येथे मतदान केंद्राबाहेर एक गाडी...

कोणत्याही थापांवर विश्वास ठेऊ नका:सुप्रिया सुळे आणि पटोलेंवर बिटकॉइनवरील आरोपांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

कोणत्याही थापांवर विश्वास ठेऊ नका:सुप्रिया सुळे आणि पटोलेंवर बिटकॉइनवरील आरोपांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

खासदीर सुप्रिया सुळे आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर झालेल्या बिटकॉइनवरील आरोपांवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी थापांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले आहे. रवींद्र पाटील तसेच सुधांशु त्रिवेदी यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर पत्रकार परिषद घेत आरोप केले होते. पुण्यातील माजी पोलिस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व...

गिलच्या खेळण्याचा निर्णय सामन्यापूर्वी- मोर्केल:गोलंदाजी प्रशिक्षक म्हणाले- तो दिवसेंदिवस चांगला होत आहे; सरावाच्या वेळी अंगठ्याला फ्रॅक्चर झाले

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरला पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मोर्केल यांनी गिलच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहे. पर्थ येथील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, गिल दिवसेंदिवस बरा होत आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या सामन्यात गिलच्या खेळण्याबाबतचा निर्णय सामन्यापूर्वी घेतला जाणार आहे. सामन्याच्या तयारीदरम्यान त्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे...

हार्दिक ICC अष्टपैलू रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला:lतिलकने 69 स्थानांची घेतली झेप; टॉप-10 गोलंदाजीत अर्शदीप आणि बिश्नोई

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आयसीसीच्या ताज्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू बनला आहे. त्याने इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टनला मागे टाकले आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत सलग दोन शतके झळकावणाऱ्या तिलक वर्माने फलंदाजांच्या क्रमवारीत 69 स्थानांची मोठी झेप घेतली आहे. आता ते तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. ऑफस्पिनर वरुण चक्रवर्तीला 36 स्थानांचा आणि सलामीवीर संजू सॅमसनला 17 स्थानांचा फायदा झाला...

मतदानाचा व्हिडीओ व्हायरल करणे पडले महागात:आखाडा बाळापुरात तरुणावर अचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

मतदानाचा व्हिडीओ व्हायरल करणे पडले महागात:आखाडा बाळापुरात तरुणावर अचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

आखाडा बाळापूर ये्थील मतदान केंद्रावर मतदान केल्याचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या एका तरुणावर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात बुधवारी आदर्श अचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघात १०१५ मतदान केंद्रावर मतदान केले जात आहे. मतदान प्रक्रियेच्या वेळी कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्‍यक खबरदारी घेण्याचे आदेश पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी ठाणेदारांना दिले आहेत. या...

सुप्रिया सुळे – नाना पटोले यांच्या विरोधात माझ्याकडे सर्व पुरावे:फॉरेन्सिक तपासणीनंतरच आरोप केल्याचा रवींद्रनाथ पाटील यांचा दावा

सुप्रिया सुळे – नाना पटोले यांच्या विरोधात माझ्याकडे सर्व पुरावे:फॉरेन्सिक तपासणीनंतरच आरोप केल्याचा रवींद्रनाथ पाटील यांचा दावा

विधानसभा निवडणुकीपूर्वी उघडकीस आलेल्या कथित बिटकॉईन घोटाळ्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील ऑडिओ हे फेक असल्याचे सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी म्हटले आहे. मात्र, आपल्याकडे सुळे आणि पटोले यांच्या विरोधातील सर्व पुरावे असल्याचा दावा या प्रकरणातील प्रमुख आरोपकर्ते माजी आयपीएस रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. इतकेच नाही तर या प्रकरणात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून या...

मस्ती आली का तुला…:संजय शिरसाटांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी; उस्मानपुरा भागातील घटना, अंबादास दानवेंचा दावा

मस्ती आली का तुला…:संजय शिरसाटांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी; उस्मानपुरा भागातील घटना, अंबादास दानवेंचा दावा

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात आमदार संजय शिरसाट यांनी उबाठाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. उस्मानपुरा भागातमतदान केंद्राजवळ हा सर्व प्रकार घडल्याची माहिती आहे. दरम्यान अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत संजय शिरसाट समोरच्या कार्यकर्त्यांना अश्लील शिवीगाळ करताना दिसून येत आहेत. तर दोन मिनिटात गायब करुन टाकेल अशी धमकी देताना दिसून येत आहे. भाजपच्या...

मेस्सी 14 वर्षांनंतर भारतात येणार:अर्जेंटिना फुटबॉल संघ पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी केरळला येणार

स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी पुढील वर्षी एका आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भारतात येणार आहे. त्याचा राष्ट्रीय संघ अर्जेंटिना केरळ दौऱ्यावर जाणार आहे. हा सामना जून किंवा जुलैमध्ये खेळवला जाईल. मात्र हा सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळवला जाईल हे सांगण्यात आलेले नाही. यापूर्वी मेस्सी 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यासाठी भारतात आला होता. मेस्सीसह अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी राज्याला भेट देईल, असे...