रामटेकमधील बंडखोरीवरुन भास्कर जाधवांनी काँग्रेसला सुनावले:बंडखोरावर कारवाईच्या मागणीची गरज काय; ही काँग्रेसची नैतिक जबाबदारी नाही का?

रामटेकमधील बंडखोरीवरुन भास्कर जाधवांनी काँग्रेसला सुनावले:बंडखोरावर कारवाईच्या मागणीची गरज काय; ही काँग्रेसची नैतिक जबाबदारी नाही का?

रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांच्यावर कारवाईच्या मागणीची गरज काय; ही काँग्रेसची नैतिक जबाबदारी नाही का?, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी काँग्रेसला सुनावले आहे. रामटेकमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या विरोधात बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई न करण्यात आल्याने ठाकरे गटाचे नेते भास्कर...

शरद पवार फेक नरेटिव्ह कंपनीचे मालक, सुप्रिया सुळे डायरेक्टर:देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र, उद्धव ठाकरेंवरही साधला निशाणा

शरद पवार फेक नरेटिव्ह कंपनीचे मालक, सुप्रिया सुळे डायरेक्टर:देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र, उद्धव ठाकरेंवरही साधला निशाणा

महायुती सरकारच्या काळात काळात अनेक उद्योग राज्याबाहेर गेले, असा आरोप महाविकास आघाडीच्यावतीने केला जात आहे. यावरून भाजपने महाविकास आघाडीवर टीका केली असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला आहे. शरद पवार हे ‘फेक नरेटिव्ह’ कंपनीचे मालक आणि सुप्रिया सुळे त्या कंपनीच्या डायरेक्टर असल्याची टिप्पणी केली. पिंपरी चिंचवड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ बुधवारी सायंकाळी काळेवाडी...

आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केलेल्या महेश गायकवाडांची सेनेतून हकालपट्टी:महायुतीमधील वादाची पुन्हा चर्चा

आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केलेल्या महेश गायकवाडांची सेनेतून हकालपट्टी:महायुतीमधील वादाची पुन्हा चर्चा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी महायुतीने मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील शिवसेना नेते महेश गायकवाड आणि महायुतीच्या इतर नऊ सदस्यांना निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये महेश गायकवाड हे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी जुन्या वादातून उल्हासनगर शहरातील पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गोळीबार केला होता. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ...

उच्च शिक्षण कर्जावर 75% क्रेडिट गॅरंटी मिळणार:पीएम विद्यालक्ष्मी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, 860 संस्थांच्या 22 लाख विद्यार्थ्यांना लाभ

नवी दिल्लीत बुधवारी झालेल्या मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी देण्यात आली. यामध्ये भारत सरकार उच्च शिक्षणासाठी 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 75% क्रेडिट गॅरंटी देईल. 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांनाही 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 3% व्याज अनुदान दिले जाईल. 4.5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना आधीच संपूर्ण व्याज अनुदान मिळत आहे. देशातील 860 प्रमुख उच्च...

जम्मू-काश्मीर विधानसभेत आमदारांमध्ये हाणामारी:एकमेकांची कॉलर पकडून धक्काबुक्की; कलम 370 चे बॅनर दाखवल्याने गदारोळ

जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान गुरुवारी आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सत्ताधारी आणि विरोधी भाजपच्या आमदारांनी एकमेकांची कॉलर पकडून एकमेकांना धक्काबुक्की केली. सभागृहात गदारोळ झाल्यानंतर अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब केले. वास्तविक, लंगेटचे आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम 370 मागे घेण्याचा बॅनर सभागृहात फडकावला. बॅनरवर लिहिले होते, ‘आम्हाला कलम 370 आणि 35A पुनर्स्थापित करायचे आहे आणि सर्व राजकीय कैद्यांची सुटका हवी...

दुरंगी लढतीत अमित ठाकरेंच्या विजयाची शक्यता कमी:पण तिरंगी लढतीत आम्हा दौघांपैकी एकाला संधी, एकनाथ शिंदे यांचा दावा

दुरंगी लढतीत अमित ठाकरेंच्या विजयाची शक्यता कमी:पण तिरंगी लढतीत आम्हा दौघांपैकी एकाला संधी, एकनाथ शिंदे यांचा दावा

मनसेचे आणि आमच्यामध्ये भांडूप मतदारसंघासाठी बोलणं झाले होते. अमित ठाकरे त्या मतदारसंघातून लढतील असे आम्हाला सांगण्यात आले होते, त्यानुसार आम्ही तयारी केली. पण अमित ठाकरे अचानक माहीममधून उभे राहिले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही बाळा नांदगावकर यांच्या मतदारसंघात महायुतीम्हणून उमेदवार दिला नाही. राज ठाकरे यांनी अमित यांना माहीममधून...

सदाभाऊ खोतांची शरद पवारांबद्दलच्या विधानावरून माफी:म्हणाले – कुणाच्या व्यंगाला उद्देशून बोलण्याचा हेतू नव्हता, ही गावगाड्याची भाषा

सदाभाऊ खोतांची शरद पवारांबद्दलच्या विधानावरून माफी:म्हणाले – कुणाच्या व्यंगाला उद्देशून बोलण्याचा हेतू नव्हता, ही गावगाड्याची भाषा

रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यावरून सदाभाऊ खोत यांच्यावर चहूबाजूने टीकेची झोड उठली होती. महाविकास आघाडीसह महायुतीतील अजित पवार यांनीही सदाभाऊ खोत यांना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे. माझ्या वाक्याचा विपर्यास करण्यात...

खोतांच्या वक्तव्यावर अजित पवारांचा संताप:’विनाश काले विपरीत बुद्धी’; भाजप नेत्यांना उघडपणे इशारा देण्याची पहिलीच वेळ

खोतांच्या वक्तव्यावर अजित पवारांचा संताप:’विनाश काले विपरीत बुद्धी’; भाजप नेत्यांना उघडपणे इशारा देण्याची पहिलीच वेळ

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील अंतर खूपच वाढले आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही करत आहेत. मात्र सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार हे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ म्हणत अजित पवारांनी खोतांना सुनावले आहे. इतकेच नाही तर आपण त्यांना फोन करुन असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे देखील सांगितले असल्याचे अजित पवारांनी...

कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरण:रक्ताचे नमुने बदलल्या अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अरूणकुमार सिंग न्यायालयात शरण

कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरण:रक्ताचे नमुने बदलल्या अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अरूणकुमार सिंग न्यायालयात शरण

पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात कारमध्ये मागे बसलेल्या एका अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अखेर आरोपी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात शरण आला आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. अरुणकुमार देवनाथ सिंग असे त्याचे नाव आहे. कारचालक मुलाच्या दोन अल्पवयीन मित्रांना वाचविण्यासाठी या गुन्ह्यात यापूर्वी अटक करण्यात आलेले...

उद्धव ठाकरेंचा वचननामा जाहीर:मुलांना मुलींसारखेच मोफत शिक्षण देणार, मुंबईतील सागरी पुलाचे आश्वासन पूर्ण केल्याचा दावा

उद्धव ठाकरेंचा वचननामा जाहीर:मुलांना मुलींसारखेच मोफत शिक्षण देणार, मुंबईतील सागरी पुलाचे आश्वासन पूर्ण केल्याचा दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गुरुवारी विधानसभा निवडणुकीचा आपला वचननामा जाहीर केला. मुलांना मुलींसारखेच मोफत शिक्षण देण्यासह कोळी बांधवांचा त्यांना हवा असणारा विकास, गृहनिर्माण धोरण ठरवणे, मुंबईसारखाच महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांतील झोपडपट्ट्यांचा विकास, मुंबईतील पळवलेले वित्तीय केंद्र नव्याने धारावीत उभारू अशी विविध आश्वासने ठाकरे गटाने या वचननाम्याद्वारे दिली आहेत. विशेषतः मुंबईकरांना सागरी पुलाचे दिलेले वचन पूर्ण केल्याचा दावाही उद्धव ठाकरे...