पैठण येथे आग, कामगाराचा गुदमरून मृत्यू:इनकोर हेल्थ केअर कंपनीत लागलेली आग अग्निशमन दलाने 4 तासांत विझविली

पैठण एमआयडीसीतील इनकोर हेल्थ केअर कंपनीत वेल्डिंगदरम्यान आग लागून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी घडली. रामदास जगन्नाथ बडसल (५४) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते कंपनीत कायमस्वरूपी कर्मचारी होते. दुसऱ्या मजल्यावर वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक ठिणगी उडाली. त्यामुळे आग लागली. वरच्या मजल्यावर धुराचे लोळ पसरले. रामदास बडसल आग पाहून वर गेले. मात्र धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आमदार विलास भुमरे यांनी कंपनीत पाहणी केली. अडकलेल्या सर्व कामगारांना तत्काळ बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. रामदास बडसल दोन तासांनी बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या आगीत इतर दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. आग लागल्याचे कळताच कंपनीमध्ये काम करत असलेल्या १०२ महिलांसह दीडशे कर्मचाऱ्यांना पंधरा मिनिटात कंपनीच्या गेटच्या बाहेर पोलिसांसह व्यवस्थापन व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. परंतु वरच्या मजल्यावर काम करीत असलेला रामनाथ बडसल या आगीच्या धुराळात मयत झाला. पैठण एमआयडीसीमध्ये एकच अग्निशमन गाडी असून पैठण नगर परिषद व संभाजीनगर येथील अग्निशमन दलाला पाचारण करून चार तासात ही आग विझविण्यात आली. संभाजीनगरच्या अग्निशमन विभागाला आमदार भुमरे यांनी तत्काळ फोन करत अधिकच्या गाड्या पाचारण केल्या. इनकोर हेल्थ केअर ही ९० च्या दशकातील पैठण एमआयडीसीतील सर्वात मोठी मेडिटेशन कंपनी आहे. पैठण एमआयडीसी हद्दीत इनकोर फार्मा ही कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये अंदाजे ३०० कामगार काम करतात. ३ शिफ्टमध्ये काम चालते. प्रत्येक शिफ्टला अंदाजे १०० ते १२५ कामगार कामावर असतात. आज रोजी सदर कंपनीत आग लागली आहे. कंपनीच्या सर्व्हिस फ्लोअरवरील एसीच्या कुलिंग सिस्टीमजवळ स्पार्किंग होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले असून कामगार बाहेर काढले. पैठण एमआयडीसीतील इनकोर कंपनीत आग लागल्यावर कामगारांना बाहेर काढत आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा नाही : इनकोर हेल्थ केयर कंपनीमध्ये सकाळच्या आठ वाजेच्या शिफ्टमधील कामगार काम करीत असताना दुपारी पावणेतीन वाजेच्या दरम्यान कंपनीच्या वरच्या मजल्यावर वेल्डिंग करण्याचे काम सुरू असताना वेल्डिंगची एक ठिणगी सर्व्हिस वायरवर पडल्याने ही आग लागली गेल्याचे मुधलवाडीचे माजी सरपंच भाऊ लबडे यांनी सांगितले. दीडशे कामगारांपैकी १०२ महिला कार्यरत