जागतिक पर्यटक केंद्र बनण्याची योजना सर्वप्रथम भास्करमध्ये:80 एकरांत 750 कोटींतून साकारतेय रामायण पार्क, उद्यानात प्रभू श्रीरामांची 151 फूट उंच मूर्ती उभारणार!
प्रभू श्रीरामांची तपोभूमी चित्रकूटला जागतिक धार्मिक आणि पर्यटनस्थळाच्या रूपात विकसित करण्याची योजना मध्य प्रदेश सरकारने तयार केली आहे. रामायण काळाशी निगडित स्थान आणि नगरांत आधुनिक परिवहन सेवा विकसित करण्यासाठी ७५० कोटी खर्च करण्यात येतील. त्यासाठी डीपीआर तयार झाला आहे. संपूर्ण नगरात श्रीरामांची छबी असेल. त्यासाठी ८० एकरांत रामायण एक्सपीरियन्स पार्क बनवले जाईल. त्यात प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या विशाल मूर्ती असतील. रामायण काळातील स्थळांच्या प्रतिकृती, ५ डी-३ डी होलोग्राम आणि लाइट-साउंडही असतील. अाधुनिक सोयी-सुविधांवर विशेष लक्ष असेल. त्याशिवाय मंदाकिनी नदीवर अतिरिक्त सेतू बनेल. ध्यान केंद्रात १ हजार संत राहू शकतील… रामायणकालीन घटनांचे सजीव देखावे
राजोला गावात ८० एकरांत रामायण एक्सपीरियन्स पार्क बनेल. त्यावर १०० कोटी रुपये खर्च होतील. पार्कमध्ये प्रभू श्रीरामांची १५१ फूट उंच मूर्ती बनवली जाईल. ५ डी आणि ३ डी प्रेझेंटेशनद्वारे रामायण काळातील घटनांचा जिवंत देखावा भाविकांना पाहायला मिळणार आहे.