नवोदित खेळाडूसाेबत काेहलीचे खटके:बॉक्सिंग डे कसाेटीत पहिल्या दिवशी कोहलीने खांद्याने दिला धक्का; चाहत्यांची टीका
मेलबर्नमध्ये गुरुवारपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसाेटी सुरू झाली. विराट कोहलीच्या एका कृतीमुळे पहिलाच दिवस वादग्रस्त ठरला. नाणेफेक जिंकल्यावर ऑस्ट्रेलियासाठी सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा सलामीला आले. १० व्या षटकाच्या समाप्तीनंतर विराट चेंडू उचलून पुढे सरकला व समोर कोन्टासवर त्याचा धक्का लागला. कोहलीने त्याला खांद्याने जाणूनबुजून धक्का मारल्याचे मानले जात आहे. माफी न मागता कोहली पुढे सरकला तेव्हा कॉन्स्टास काहीतरी बोलला. कोहलीनेही वादाच्या स्वरात प्रत्युत्तर दिले. म्हणाले – अशी वर्तणूक अनावश्यक ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग म्हणाला की, विराटची चूक होती यात शंका नाही. रवी शास्त्रींनी या वर्तनाला अनावश्यक म्हटलेे. माजी कर्णधार सुनील गावसकर म्हणाले, समोरून कुणी येताना दिसले तर तुम्ही मार्ग बदलू शकता. यामुळे कुणीही लहान होत नाही. ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार ॲलिसा हिली म्हणाली, एका स्टार फलंदाजाने सर्वात तरुण खेळाडूला लक्ष्य केले. सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक विराटकडून ही अपेक्षा नाही. आयसीसीने विराटची कृती आचारसंहितेच्या स्तर-१ चे उल्लंघन मानली. कोहलीला एक डी-मेरिट गुण मिळाला. बीसीसीआय प्रत्येक खेळाडूला एका कसोटीसाठी १५ लाख रुपये मॅच फी देते. त्याला मॅच फीच्या २० टक्के (तीन लाख रुपये) दंडही ठोठावण्यात आला आहे. आयसीसीच्या आचारसंहितेनुसार क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारच्या अनुचित ‘शारीरिक झटापटी’वर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. विराटचा चाहता आणि पदार्पणाच्याच सामन्यात ६० धावांची खेळी करणारा १९ वर्षीय सॅम कॉन्स्टास नंतर म्हणाला, असे घडते. मैदानावर घडणाऱ्या गोष्टी, मैदानावरच राहतात. सन २०१८ मध्ये द. आफ्रिका-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत कागिसो रबाडा-स्टीव्ह स्मिथ यांची टक्कर झाली. रबाडाविरुद्ध तीन पेनल्टी गुण लावण्यात आले. एक डी-मेरिट गुण नावावर धक्का दिल्यानंतर कॉन्स्टासने अडवताच कोहली वळला व वादग्रस्त पद्धतीने बोलताना दिसला. इतर खेळाडूंनी हस्तक्षेप केला.