मला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे फोन आले:कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे, मामाच्या खुनाप्रकरणी आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रीया

मला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे फोन आले:कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे, मामाच्या खुनाप्रकरणी आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रीया

पुण्यात हडपसर भागात भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांचे अपहरण करत खून करण्यात आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यावर आता योगेश टिळेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. योगेश टिळेकर म्हणाले, मला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी फोन केले, सर्वजण माझ्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. योगेश टिळेकर म्हणाले, पोलिस यंत्रणा काम करत आहेत. लवकरच पोलिस या मागचे कारण शोधून काढतील. मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी फोन केले. सर्वजण माझ्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहेत. पोलिस यंत्रणेवर माझा विश्वास आहे, यात कुठलेही राजकारण न करता ते या घटनेचा तपास करतील. पुढे बोलताना योगेश टिळेकर म्हणाले, आमच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सामान्य माणूस असो किंवा आमदाराचा मामा असो शेवटी ही यंत्रणा आहे. सामान्य नागरिकांवर अन्याय झाला तरी राज्य सरकार चांगले काम करते. मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्र्यांनी देखील फोन केला होता. माझे कुटुंबीयांच्या पाठीशी सर्वजण खंबीरपणे उभे आहेत, असे टिळेकर म्हणाले. सतिश वाघ यांचे पुत्र ओंकार वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सतिश वाघ यांची लोणी काळभोर परिसरातील माळीमळा येथे वडिलोपार्जित शेती आहे. ही शेती सतिश वाघ करतात. या शेतातील एक एकराबाबत दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे. सतिश वाघ यांनी 10 वर्षांपूर्वी एका व्यक्तीला तीस ते पस्तीस लाख रुपये जमिनीच्या व्यवहारासाठी दिले होते व पैसे परत मिळत नसल्याने वडील हे वारंवार कॉल करत असल्याचे ओंकार वाघ यांनी त्यांच्या फिर्यादीत सांगितले आहे. सतिश वाघ हे आज सकाळच्या सुमारास सोलापूर रस्त्यावरील एका हॉटेलजवळ थांबले होते. यावेळी एक चारचाकी गाडी त्यांच्याजवळ आली. त्यातून दोघे जण खाली उतरले. दोघांनी सतिश वाघ यांच्याकडे कशाबद्दत तरी विचारपूस करण्याचे नाटक केले. बोलत असतानाच अपहरणकर्त्यांनी सतिश वाघ यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. त्यानंतर ते निघून गेले. दरम्यान, सतिश वाघ यांचे अपहरण का करण्यात आले? यामागे वैयक्तिक किंवा राजकीय वैमनस्यातून हे कृत्य करण्यात आले का? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment