रुपाली चाकणकर – रोहिणी खडसेंत जुंपली:आमदारकीच्या राजकारणातून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या महिला नेत्यांनी काढला एकमेकींचा बाप

रुपाली चाकणकर – रोहिणी खडसेंत जुंपली:आमदारकीच्या राजकारणातून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या महिला नेत्यांनी काढला एकमेकींचा बाप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली चाकणकर व शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. या महिला नेत्यांनी यावेळी थेट एकमेकींचा बाप काढत, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमुळे अवघे राजकारण ढवळून निघाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा मुक्ताईनगरमध्ये नुकताच एक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावर निशाणा साधला होता. तोंडात सोन्याचा चमका घेऊन जन्माला आलेल्या माणसाला दीड हजारांची किंमत कशी कळणार? लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्यांचे स्वतःचे कोणतेही कर्तृत्व नाही. त्यांना वडिलांच्या नावावर सुरक्षित असणारा मतदारसंघही जिंकता आला नाही, असे त्या म्हणाल्या. चाकणकर बाप बदलणाऱ्यांपैकी एक रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्या या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या की, रुपाली चाकणकर या बाप बदलणाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी आपले बाप बदलले असून, त्यांना कोणताही जनाधार नाही. त्यामुळे त्यांच्या विधानाला मी कोणतेही महत्त्व देत नाही. सध्या त्यांना आमदारकीचे डोहाळे लागलेत. पण त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावे. रोहिणी खडसे यांच्या या टीकेनंतर चाकणकर कोणता पलटवार करतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. खडसेंनी सीडीचा कांगावा करत तुतारी हाती घेतली उल्लेखनीय बाब म्हणजे रुपाली चाकणकर यांनी बुधवारीच एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला होता. त्या म्हणाल्या होत्या की, स्वतःच्या स्वार्थासाठी कुणी किती पक्ष फिरावेत, हा ज्याचा त्याचा विषय आहे. सोयीचे राजकारण करणे ही खडसे कुटुंबीयांची भूमिका आहे. याविषयीच्या बातम्या गत काही दिवसांपासून आम्ही पाहत आहोत. आता गणेश विसर्जन झाले आहे. त्यामुळे पुढे काय होते यावर आमची नजर आहे. खडसेंनी आतापर्यंत सुनेसाठी राजकारण केले. आता ते लेकीच्या राजकारणासाठी कोणती भूमिका घेतात हे पाहावे लागेल. आमच्याकडे सीडी आहे असे सांगून त्यांनी तुतारी हातात घेतली. त्यांनी आपल्याकडील सीडी योग्यवेळी दाखवण्याचा इशाराही दिला. पण आता ते आपल्याकडे अशी कोणतीही सीडी नसल्याचा कांगावा करत आहेत. याचा अर्थ ते त्यांच्या पद्धतीने सोयीचे राजकारण करत आहेत. चंद्रकांत पाटील यांचीही खडसेंवर टीका दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनीही आमदार एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे यांनी एकेठिकाणी बोलताना सत्ताधाऱ्यांवर राजकारणाचा स्तर घसरल्याची टीका केली होती. पण त्यांच्यामुळेच राजकारणाचा स्तर घसरला हे ही तेवढेच सत्य आहे. त्यांनी आतापर्यंत केलेली विविध विधाने पाहून त्याची प्रचिती येते. ते एवढे मोठे नेते कसे झाले? हा माझ्यापुढे प्रश्न आहे. माझ्यासाठी खडसे संपले आहेत.

​राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली चाकणकर व शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. या महिला नेत्यांनी यावेळी थेट एकमेकींचा बाप काढत, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमुळे अवघे राजकारण ढवळून निघाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा मुक्ताईनगरमध्ये नुकताच एक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावर निशाणा साधला होता. तोंडात सोन्याचा चमका घेऊन जन्माला आलेल्या माणसाला दीड हजारांची किंमत कशी कळणार? लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्यांचे स्वतःचे कोणतेही कर्तृत्व नाही. त्यांना वडिलांच्या नावावर सुरक्षित असणारा मतदारसंघही जिंकता आला नाही, असे त्या म्हणाल्या. चाकणकर बाप बदलणाऱ्यांपैकी एक रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्या या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या की, रुपाली चाकणकर या बाप बदलणाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी आपले बाप बदलले असून, त्यांना कोणताही जनाधार नाही. त्यामुळे त्यांच्या विधानाला मी कोणतेही महत्त्व देत नाही. सध्या त्यांना आमदारकीचे डोहाळे लागलेत. पण त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावे. रोहिणी खडसे यांच्या या टीकेनंतर चाकणकर कोणता पलटवार करतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. खडसेंनी सीडीचा कांगावा करत तुतारी हाती घेतली उल्लेखनीय बाब म्हणजे रुपाली चाकणकर यांनी बुधवारीच एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला होता. त्या म्हणाल्या होत्या की, स्वतःच्या स्वार्थासाठी कुणी किती पक्ष फिरावेत, हा ज्याचा त्याचा विषय आहे. सोयीचे राजकारण करणे ही खडसे कुटुंबीयांची भूमिका आहे. याविषयीच्या बातम्या गत काही दिवसांपासून आम्ही पाहत आहोत. आता गणेश विसर्जन झाले आहे. त्यामुळे पुढे काय होते यावर आमची नजर आहे. खडसेंनी आतापर्यंत सुनेसाठी राजकारण केले. आता ते लेकीच्या राजकारणासाठी कोणती भूमिका घेतात हे पाहावे लागेल. आमच्याकडे सीडी आहे असे सांगून त्यांनी तुतारी हातात घेतली. त्यांनी आपल्याकडील सीडी योग्यवेळी दाखवण्याचा इशाराही दिला. पण आता ते आपल्याकडे अशी कोणतीही सीडी नसल्याचा कांगावा करत आहेत. याचा अर्थ ते त्यांच्या पद्धतीने सोयीचे राजकारण करत आहेत. चंद्रकांत पाटील यांचीही खडसेंवर टीका दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनीही आमदार एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे यांनी एकेठिकाणी बोलताना सत्ताधाऱ्यांवर राजकारणाचा स्तर घसरल्याची टीका केली होती. पण त्यांच्यामुळेच राजकारणाचा स्तर घसरला हे ही तेवढेच सत्य आहे. त्यांनी आतापर्यंत केलेली विविध विधाने पाहून त्याची प्रचिती येते. ते एवढे मोठे नेते कसे झाले? हा माझ्यापुढे प्रश्न आहे. माझ्यासाठी खडसे संपले आहेत.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment