सरकारची भ्रष्टाचाऱ्यांशी पार्टनरशिप:मनोज जरांगेंचा जनतेला सावध राहण्याचा सल्ला; धनंजय मुंडे यांच्या कथित टोळीवर कडाडून हल्ला

सरकारची भ्रष्टाचाऱ्यांशी पार्टनरशिप:मनोज जरांगेंचा जनतेला सावध राहण्याचा सल्ला; धनंजय मुंडे यांच्या कथित टोळीवर कडाडून हल्ला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारची भ्रष्टाचाऱ्यांशी पार्टनरशिप असल्याची तिखट टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. राज्यातील सामाजिक प्रश्न सोडवण्यासंबंधी आमची या सरकारकडून मोठी अपेक्षा होती. पण हे सरकार भ्रष्टाचाऱ्यांशी पार्टनरशिप करणारे निघाले. त्यामुळे जनतेने सावध राहण्याची गरज आहे, असे ते म्हणालेत. मनोज जरांगे पाटील गुरुवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, विद्यमान सरकार राज्यातील सामाजिक प्रश्न सोडवेल असा आमचा विश्वास होता. पण हे सरकार भ्रष्टाचाऱ्यांशी पार्टनशिप असणारे निघाले. असे असले तरी आम्ही संतोष देशमुख खून प्रकरण एकांगी पडू देणार नाही. जनतेने यासंबंधी वेळीच सावध व्हावे. सामान्य माणसांनीही मोठ्या ताकदीने उभे रहावे. धनंजय मुंडे यांच्या टोळीने सामाजिक आरोग्य बिघडवण्याचे व किचकट जातीयवाद सुर करण्याचे काम केले. आडनाव वगळल्याने जातीयवाद संपणार नाही बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी जिल्ह्यातील जातीयवाद रोखण्यासाठी विविध पाऊले उचलली जात आहेत. यात त्यांनी बीड पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या नेमप्लेटमधील आडनाव वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता बीडमधील एसपीपासून सामान्य पोलिस कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांना त्यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. पत्रकारांनी याविषयी मनोज जरांगे यांना छेडले असता त्यांनी केवळ आडनावे काढल्याने जातीयवाद मिटणार नसल्याचे ठणकावून सांगितले. पोलिसांची केवळ आडनावे नेमप्लेटवरून वगळल्याने जातीयवाद मिटणार नाही. हे चूक आहे. सरकारने कायद्याचे उल्लंघन करू नये. नावे काढण्याऐवजी त्यांनी पोलिसांसहीत गुन्हेगारांची टोळी जेरबंद करावी. नावापुढील आडनाव काढल्याने जातीयवाद आणखी फोफावेल, असे ते म्हणाले. आमदारांनी अधिवेशन संपण्यापूर्वी मराठा आरक्षणावर पुढाकार घ्यावा मनोज जरांगे पुढे म्हणाले, सरकारने आम्हाला मराठा आरक्षणाच्या मुद्यावरील आमच्या 8 पैकी 4 मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. पण ते अद्यापही पूर्ण केले नाही. शिंदे समिती काम करत नाही. या समितीने किती नोंदी शोधल्या? कक्ष कुठे – कुठे सुरू झाले? यावर पुढे काहीच झाले नाही. आंतरवालीसह राज्यभरातील मराठा आंदोलकावरील गुन्हे अद्यापही मागे घेतले गेले नाहीत. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील मराठा आमदारांवर जनतेने गुलाल उधळला आहे. त्यांना मोठे केले आहे. आता त्या आमदारांनी मराठ्यांच्या लेकरांसाठी पुढाकार घेतला पाहिजे. या आमदारांनी अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणी पुढाकार घेतला नाही तर जनता त्यांना पाहून घेईल. धनंजय देशमुखांच्या साडूचे समर्थन करत नाही पोलिसांनी सतीश उर्फ खोक्या भोसलेला अटक केली. त्यामुळे आम्ही या सरकारची भ्रष्टाचाऱ्यांशी पार्टनरशिप असल्याचा आरोप करत आहोत. मी धनंजय देशमुख यांच्या साडूच्या व्हिडिओचे समर्थन करत नाही. पण संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हा खोडसाळपणा करण्यात आला आहे. राजकारणी एखाद्या प्रकरणात घुसले तर आमच्यासारख्यांना सामाजिक प्रश्न सोडवताना अडचणी येतात, असे ते म्हणाले. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे अजून न सापडणे ही मोठी शोकांतिका असल्याचेही जरांगे यावेळी म्हणाले. हे ही वाचा… जयंत पाटलांचे मन सध्या कशातच लागत नाही:त्यांनी स्वतःच नागपुरात मला सांगितले, हसन मुश्रीफ यांचा दाव्याने शरद पवार गटात खळबळ कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मन सध्या कशातच लागत नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. विशेष म्हणजे स्वतः जयंत पाटील यांनीच नागपूर मुक्कामी ही गोष्ट आपल्याला सांगितल्याचे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे जयंत पाटलांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा पुन्हा नव्या दमाने सुरू झाली आहे. वाचा सविस्तर

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment