पुण्यातील एन्जाॅय ग्रुपच्या प्रमुखासह साथीदारांवर मोक्का कारवाई:अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांचे आदेश

पुण्यातील एन्जाॅय ग्रुपच्या प्रमुखासह साथीदारांवर मोक्का कारवाई:अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांचे आदेश

पुणे शहरातील घोरपडे पेठेतील एन्जाॅय ग्रुपच्या प्रमुखासह साथीदारांविरुद्ध अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. एन्जाॅय ग्रुपचा म्होरक्या अमित म्हस्कू अवचरे (वय २७, रा. फुरसुंगी, हडपसर), सुमीत उत्तरेश्वर जाधव (वय २६, रा. गंज पेठ), लतिकेश गौतम पोळ (वय २२, रा. कात्रज-कोंढवा रस्ता), शुभम उर्फ मॅटर अनिल जगताप (वय २७, रा. भेकराईनगर, हडपसर), ओंकार उर्फ भैय्या अशोक जाधव (वय २४, रा. भारती विद्यापीठ), अजय उर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय २७), राज बसप्पा उर्फ बसवराज स्वामी (वय २७, दोघे रा. भेकराईनगर, हडपसर) अशी माेक्का कारवाई केलेल्या सराइतांची नावे आहेत. अमित अवचरे टोळीप्रमुख आहे. खुनाच्या तयारीत असताना पोलिसांनी केली अटक
२०१३ मध्ये शंकरशेठ रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये कुणाल पोळ याचा पिस्तुलातून गोळ्या झाडून विशाल उर्फ जंगल्या सातपुते आणि साथीदारांनी खून केला होता. वर्चस्वाच्या वादातून पोळ याचा खून करण्यात आला होता. लोणीकंद भागातील कोलवडी रस्त्यावर २९ ऑगस्ट रोजी अवचरे आणि साथीदार सातपुते याचा खून करण्यासाठी दबा धरून बसले होते. त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कारवाईत ७ पिस्तुले, २३ काडतुसे जप्त
पोलिसांच्या पथकाने सापळा लावून अवचरेसह साथीदारांना पकडले. त्यांच्याकडून सात पिस्तुले आणि २३ काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. एन्जाॅय ग्रुपची घोरपडे पेठ, लोणीकंद भागात दहशत असल्याने लोणीकंद पोलिसांनी अवचरेसह साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत कापुरे, सागर कडू, शुभम सातव, सुधीर शिवले यांनी प्रस्ताव तयार केला. यानंतर पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी मोक्का कारवाईचे आदेश दिले. सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे पुढील तपास करत आहेत.

​पुणे शहरातील घोरपडे पेठेतील एन्जाॅय ग्रुपच्या प्रमुखासह साथीदारांविरुद्ध अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. एन्जाॅय ग्रुपचा म्होरक्या अमित म्हस्कू अवचरे (वय २७, रा. फुरसुंगी, हडपसर), सुमीत उत्तरेश्वर जाधव (वय २६, रा. गंज पेठ), लतिकेश गौतम पोळ (वय २२, रा. कात्रज-कोंढवा रस्ता), शुभम उर्फ मॅटर अनिल जगताप (वय २७, रा. भेकराईनगर, हडपसर), ओंकार उर्फ भैय्या अशोक जाधव (वय २४, रा. भारती विद्यापीठ), अजय उर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय २७), राज बसप्पा उर्फ बसवराज स्वामी (वय २७, दोघे रा. भेकराईनगर, हडपसर) अशी माेक्का कारवाई केलेल्या सराइतांची नावे आहेत. अमित अवचरे टोळीप्रमुख आहे. खुनाच्या तयारीत असताना पोलिसांनी केली अटक
२०१३ मध्ये शंकरशेठ रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये कुणाल पोळ याचा पिस्तुलातून गोळ्या झाडून विशाल उर्फ जंगल्या सातपुते आणि साथीदारांनी खून केला होता. वर्चस्वाच्या वादातून पोळ याचा खून करण्यात आला होता. लोणीकंद भागातील कोलवडी रस्त्यावर २९ ऑगस्ट रोजी अवचरे आणि साथीदार सातपुते याचा खून करण्यासाठी दबा धरून बसले होते. त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कारवाईत ७ पिस्तुले, २३ काडतुसे जप्त
पोलिसांच्या पथकाने सापळा लावून अवचरेसह साथीदारांना पकडले. त्यांच्याकडून सात पिस्तुले आणि २३ काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. एन्जाॅय ग्रुपची घोरपडे पेठ, लोणीकंद भागात दहशत असल्याने लोणीकंद पोलिसांनी अवचरेसह साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत कापुरे, सागर कडू, शुभम सातव, सुधीर शिवले यांनी प्रस्ताव तयार केला. यानंतर पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी मोक्का कारवाईचे आदेश दिले. सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे पुढील तपास करत आहेत.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment