स्वारगेट बलात्कार प्रकरणात नवे वळण:पीडितेची वकील असीम सरोदे यांची नियुक्तीची मागणी फेटाळली; स्थानकाचे चार अधिकारी निलंबित

स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बस मध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात अाल्याचा धक्कादायक प्रकार घडला हाेता. त्यानंतर अाराेपी दत्तात्र्य गाडे यास पाेलीसांनी अटक केली. परंतु यादरम्यान, सदर शारिरिक संबंध परस्पर सहमतीने झाल्याची टिका पिडितेवर हाेऊ लागल्याने तिने अॅड.असीम सराेदे यांना भेटून न्यायालयात चारित्र्यहनन अाराेप टाळण्याची दाद मागण्यासाठी अर्ज केला. सदर अर्जाची कार्यकक्षा अापल्या अखत्यारित येत नसल्याचे सांगत न्यायालयाने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज देण्यास सांगितले. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कलम १४४ नुसार पाेलीस अायुक्तच असा अादेश काढू शकतात असा निकाल दिला. याबाबत काेणताही अादेश अद्याप निघाला नाही. परंतु पिडितेने पाेलीसांकडे अॅड.असीम सराेदे यांची सरकारी वकील म्हणून याप्रकरणात नियुक्ती करण्याची मागणी केली. पुणे पाेलीसांनी ही नियुक्ती फेटाळली असून राज्यसरकारकडे विशेष सरकारी वकील म्हणून याप्रकरणात अॅड.अजय मिसर यांची नियुक्ती करावी अशी मागणी केल्याचा प्रस्ताव पाठवला अाहे. स्वारगेट एसटी स्थानकाचे चार अधिकारी निलंबीत स्वारगेट एसटी स्थानकात २५ फेब्रुवारी राेजी शिवशाही बस मध्ये एका २६ वर्षीय प्रवासी तरुणीवर एका सराईत गुन्हेगाराने कंडक्टर असल्याचे सांगत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला हाेता. याप्रकरणात स्वारगेट एसटी स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका परिवहन विभागाच्या अंर्तगत चाैकशीत केल्याचा ठेऊन चारजणांचे निलंबन करण्यात अाले अाहे. सुरक्षेबाबत हलगर्जीपणा केल्याचे विभागीय चाैकशीत समोर निलंबन कारवाई करण्यात अालेल्या मध्ये स्वारगेट एसटी स्थानकाचे वरिष्ठ अागार व्यवस्थापक जयेश पाटील, कनिष्ठ अागार व्यवस्थापक पल्लवी पाटील, सहवाहतुक निरीक्षक सुनील मेळे, स्थानक प्रमुख माेहिनी ढगे यांचा समावेश अाहे. संबंधीत घटना ही गंभीर असून घटना घडली त्यावेळी बस स्थानकाची जबाबदारी असलेले अधिकारी यांनी प्रवाशांचे सुरक्षेबाबत हलगर्जीपणा केल्याचे विभागीय चाैकशीत अाढळून अालेले अाहे. यापूर्वी सदर बस स्थानकावरील २२ कंत्राटी सुरक्षारक्षक यांना देखील निलंबित करण्यात अालेले अाहे.