उपमुख्यमंत्री नाराज होऊन कुठे गेले?:चंद्र दिसतोय का ते बघा, कोणत्या गावात गेले शोधा; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कुठे गेले?:चंद्र दिसतोय का ते बघा, कोणत्या गावात गेले शोधा; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

युवसेना प्रमुख व ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री दावोसला गेले आहेत, पण ते उपमुख्यमंत्री नाराज होऊन कुठे गेले? आज चंद्र दिसतोय का ते बघा, ते कोणत्या गावाला गेले ते शोधा, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, दावोसमध्ये जर राज्यासाठी काही मोठे येत असेल तर त्याचे आम्ही स्वागत करू. पण मागील दावोस दौऱ्यात जो खर्च करण्यात आला, जी उधळपट्टी झाली ती होऊ नये. पुढे सह पालकमंत्रीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, सह पालकमंत्री म्हणजे ते त्या त्या जिल्ह्याचे मालकमंत्री आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, वाल्मीक कराडला हे पकडू शकले नाही, तो शरण आला. पण सैफ आली खान प्रकरणात पोलिसांना मोकळीक दिली तर ते कसे काम करू शकतात याचे उदाहरण आपण काल पहिले आहे. पोलिसांचे आम्ही अभिनंदन करतो. 10 वर्षे झाले भाजप सरकार आहे. बांगलादेशी विरोधात मोर्चा काढतात तरीपण हे घुसखोर बांगलादेशी आले कसे? आपले केंडतर सरकार काहीच करू शकत नाही का? हे आरोपी बांगलादेशी राहतात कुठे? तर ठाणे शहरात, असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, सध्या राज्यात पालकमंत्री पदावरून महायुती सरकारमध्ये मतभेद उघडकीस आले आहेत. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. मात्र रायगड येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांची पालकमंत्री म्हणून निवडण करण्यात आली होती. यामुळे शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे नाराज झाले असून त्यांच्या समर्थकांनी देखील आक्रमक होत निषेध व्यक्त केला आहे. तसेच नाशिक येथे भाजपच्या गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती, यामुळे शिंदे गटाचे दादा भुसे व समर्थक नाराज असल्याचे समोर आले आहे. या सगल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment