घरात बसणाऱ्यांना लोकांनी मतं दिली नाहीत:संजय शिरसाटांचा ठाकरेंना टोला; म्हणाले – ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेता कामा नये
घरात बसणाऱ्यांना लोकांनी मते दिली नाहीत असा टोला शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला आहे. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी हा टोला लगावला आहे. संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दाढीवरून हात फिरवतात. तेव्हा तेव्हा राष्ट्रामध्ये मोठ्या काहीतरी घडते आणि त्यामुळे ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेता कामा नये. हेच हलक्यात घेण्याचे काम ठाकरेंनी केलं आणि आता त्यांची काय अवस्था आम्ही करून ठेवली हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे जेव्हा शिंदे मुंबईत येतील. तेव्हा सगळ्या घडामोडी घडतील. कोणी त्यांना हलक्यात घेता कामा नये. राऊतांमुळेच ठाकरे अन् पवारांना फटका संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊतांमुळेच शिवसेना ठाकरे पक्ष संपला. राऊतांमुळेच शरद पवार यांच्या पक्षाला फटका बसला आणि अजूनही त्याची बडबड सुरूच आहे. राऊतांना केवळ शेतकऱ्याच्या मुलाचा अपमान करणे एवढे एकच काम उरले आहे. चांगल्या कामासाठी खात्यांवरती दावा संजय शिरसाट म्हणाले की ,राज्यात चांगले काम व्हावे. यासाठी या खात्यांवरती आम्ही दावा केलेला आहे. संजय राऊत आणि त्यांचे पक्षांनी आमच्यावर जो लिंबू फिरवला होता. त्याचा उतारा करण्यासाठी एकनाथ शिंदे दरेगावी गेलेत. मोठ्या निर्णयाचे संकेत
यापूर्वी बोलताना आमदार शिरसाट म्हणाले की, ‘शिंदेंना मोठा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा ते त्यांच्या मूळ गावी जातात. संध्याकाळपर्यंत ते मोठा निर्णय घेऊ शकतात.’ खासदार संजय राऊत म्हणाले, ‘मुख्यमंत्री नाराज होऊन गावी गेले आहेत म्हणे. अनेकदा ते नेमके अमावस्येच्या दिवशी गावी का जातात ते मला कळत नाही.’