येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला पाहिजे:अजित पवारांचे शिर्डीतील अधिवेशनात महत्वाचे विधान, धनंजय मुंडेंच्या भाषणाचेही केले कौतुक

येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला पाहिजे:अजित पवारांचे शिर्डीतील अधिवेशनात महत्वाचे विधान, धनंजय मुंडेंच्या भाषणाचेही केले कौतुक

येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला पाहिजे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले. योग्य नियोजन केले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला नक्कीच फायदा होईल. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी झपाटून काम करण्यास सुरुवात केली पाहिजे, अशा सूचनाही अजित पवार यांनी शिर्डी येथील अधिवेशनात कार्यकर्त्यांना केल्या. प्रत्येक घराघरांपर्यंत आपला पक्षाचा विचार पोहचायला हवा, असेही ते म्हणाले. दरम्यान, अजित पवार यांनी यावेळी बोलताना धनंजय मुंडेंच्या भाषणाचे देखील कौतुक केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे दोन दिवसीय अधिवेशन पार पडले. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या भाषणाने अधिवेशनाचा समारोप करण्यात आला. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी देखील पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आगामी स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. काय म्हणाले अजित पवार?
पक्षाच्या पुढील वाटचालीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत शिबीर आयोजित करण्यात आले. खरे तर सर्व नेत्यांनी सकाळी कामाला लवकर सुरुवात केली पाहिजे. सर्वांनी याची नोंद घेतली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या निमित्ताने जे उमेदवारीसाठी उत्सुक आहेत किंवा पक्षाच्या पदासाठी उत्सुक आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्तित केली पाहिजे. उमेदवारांनी प्रत्येक विभागानुसार एक जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे, असेही ते म्हणाले. येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा…
योग्य नियोजन केले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला नक्कीच फायदा होईल. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी झपाटून काम करण्यास सुरुवात केली पाहिजे, असे आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. पक्षाचे संघटन वाढण्यासाठी तरुण आणि तरुणींना पक्षात काम करण्याची संधी दिली पाहिजे. येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काळ असला पाहिजे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. आपआपल्या गावात पक्ष वाढीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक गावात, गल्लीत पक्षाचा कार्यकर्ता आणि आपल्या पक्षाचा झेंडा किंवा बोर्ड लागला पाहिजे. प्रत्येक घराघरांपर्यंत आपला पक्षाचा विचार पोहचायला हवा, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. महापालिका निवडणुकीत चारचा प्रभाग राहणार
महापालिकेच्या निवडणुकीत चारचा प्रभाग राहणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. महाविकास आघाडीचे सरकार असताना चारचा प्रभाग करा, दोनचा प्रभाग करा अशा मागण्या केल्या होत्या. मात्र, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर पुन्हा राजकीय समीकरणे बदलली आणि चारचा प्रभाग करण्यात आला, असे अजित पवार यांनी सांगितले. धनंजय मुंडेंच्या भाषणाचे कौतुक
धनंजय मुंडे यांची गाडी आज भाषणात सुसाट सुटली होती. मध्यंतरी जे वावटळ उठले होते, त्याला पूर्णविराम देण्याचे काम आजच्या वक्तृतवाने आणि भाषणाने केले आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या भाषणाचे कौतुक केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात दोन कक्षांची घोषणा केली. वैद्यकीय सहाय्यता कक्ष आणि वचनपूर्ती कक्ष, हे पक्ष पातळीवर मार्चपूर्वी सुरू करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. लाडकी बहीण योजनेसाठी 3700 कोटी रुपये
माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थिती चालूच राहणार असल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले. काळजी करू नका. फक्त त्याचा लाभ गरजू महिलेला मिळाला पाहिजे. जी व्यक्ती श्रीमंत आहे, टॅक्स भरते, नोकरी आहे, त्यांच्याबाबत वेगळा विचार करणार असल्याचेही अजित पवार म्हणाले. ही योजना ज्या मायमाऊलीपर्यंत पोहोचायला हवी होती, त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवण्याचे काम महिला आणि बालविकास विभागाने केले आहे. परवाच या योजनेसाठी 3700 कोटींचा चेक महिला आणि बालविकास खात्याला दिल्याची माहिती त्यांनी दिली. 26 जानेवारीच्या आत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा सातवा हाप्ता जमा होईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment