मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत दुश्मनी नाही:व्यक्तिगत आमचे चांगले संबंध, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत दुश्मनी नाही:व्यक्तिगत आमचे चांगले संबंध, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आपली दुश्मनी नव्हती तर विरोधी पक्षाची भूमिका म्हणून विरोध होता, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. एकनाथ खडसे म्हणाले, व्यक्तिगत आमचे त्यांच्या सोबत संबंध चांगले आहेत. एका वृत्तवाहिनीला बोलताना एकनाथ खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे म्हणाले, महायुतीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या लाडक्या बहीण सारख्या योजनांचा परिणाम म्हणून महायुतीला अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. तसेच पुढे ते म्हणाले, ईव्हीएमबाबत आपला विरोध नाही, मात्र अनेक निकाल हे ईव्हीएम बद्दल संशय निर्माण करणारे राहिले आहेत. ते दूर व्हायला पाहिजे, असेही एकनाथ खडसे म्हणाले. पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, विरोधी पक्षातील भूमिका सक्षमपणे पार पाडणे, हीच माझी जबाबदारी आहे. गुलाबराव देवकर यांची व्यक्तिगत भूमिका आहे. माझे राजकीय जीवन पाहिले तर मी संघर्षामधून पुढे आलो आहे. आपले सरकार असो अथवा नसो, याची मनात शंका नसते. मी सरकार नसताना 90 साली एकटा आमदार असताना सुरुवात केली. संघर्ष केला, सरकारच्या विरोधात कठोर भूमिका घेतली होती. रोहिणी खडसे यांचा पराभव मी पहिल्याच दिवशी मान्य केला होता, असेही एकनाथ खडसे म्हणाले. पराभव मान्य केला त्यामुळे निकालाच्या संदर्भात मी प्रतिक्रिया दिली. मात्र, शंका घेण्यात वाव आहे. आम्हाला आमच्या हक्काचे बूथ माहीत असतात. त्याठिकाणी आमचा लीड कमी होतो. त्यावेळी शंका निर्माण होऊ लागली आहे. रोहिणी ताईंनी अपील करण्याचे ठरवले होते. त्यांनी अर्ज मागे घेतला, याची मला माहिती नाही, असे स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिले आहे. पुढे खडसे म्हणाले, ईव्हीएमवर शंका घ्यायला वाव आहे. कुणाल पाटील यांच्या स्वतःच्या गावात शून्य मते आहेत. त्यांच्या गावात त्यांचे 40 मते आहेत. त्यामुळे शंकेला बळकटी मिळते. महाविकास आघाडी विरोधी पक्षाची भूमिका पार पाडेल. शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही लाऊन धरू. महायुतीने अनेक आश्वासणे दिली होती. लाडक्या बहिणींना 2100 देणार असल्याचे सांगितले, मात्र आता त्यावर अटी लावण्यात येत आहेत. जे शब्द दिले आहेत ते शब्द पार पाडायला हवेत, असा सल्ला देखील एकनाथ खडसे यांनी महायुतीला दिला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment