उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर:भुमरे, बोरणारेंच्या बंडखोरीनंतर पैठण अन् वैजापूरमध्ये सभा

उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर:भुमरे, बोरणारेंच्या बंडखोरीनंतर पैठण अन् वैजापूरमध्ये सभा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज वैजापूर, पैठण दौऱ्यावर येत आहेत. वैजापूर येथे पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला, तर पैठण येथे संत ‎एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन‎ सचिन घायाळ यांच्या पक्ष‎प्रवेशासाठी ते येणार आहेत. दरम्यान संत एकनाथ कारखान्याचे‎ चेअरमन सचिन घायाळ हे आज‎ ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करत असल्याने‎ तालुक्यातील राजकीय समिकरण‎ बदलणार असून ठाकरे यांच्या‎ दौऱ्याकडे पैठणमधील विरोधकांचे ‎लक्ष लागले आहे. पैठणसह ‎जिल्ह्यातील युतीच्या सर्व जागांवर‎ पुन्हा आमचे वर्चस्व राहिल असे‎ भुमरे यांनी सांगितले. एकीकडे‎ विधानसभेसाठी सचिन घायाळ‎ दावेदारी करत आहे.तर दुसरीकडे ‎भुमरे आता खासदार झाल्याने त्यांचे ‎पुत्र विलास भुमरे विधानसभा ‎लढणार आहेत. असा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा उद्धव ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे सकाळी 10 वाजता मुंबईहून खासगी विमानाने शिर्डीला रवाना होणार आहेत. 11 वाजता शिर्डी संस्थान येथे श्री साईबाबांचे दर्शन ते घेणार आहेत. त्यानंतर ते मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी ते शिर्डीहून वैजापूरकडे रवाना होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. वैजापुरात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत काही जणांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. यानंतर उद्धव ठाकरे पैठणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे सचिन घायाळ यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. उद्धव ठाकरे कुणावर साधणार निशाणा? विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांचा दौरा होत असल्याने, ठाकरे आज कुणावर निशाणा साधतात? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. उद्धव ठाकरे दौरा करत असलेल्या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेत बंडखोर झाली होती.

​शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज वैजापूर, पैठण दौऱ्यावर येत आहेत. वैजापूर येथे पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला, तर पैठण येथे संत ‎एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन‎ सचिन घायाळ यांच्या पक्ष‎प्रवेशासाठी ते येणार आहेत. दरम्यान संत एकनाथ कारखान्याचे‎ चेअरमन सचिन घायाळ हे आज‎ ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करत असल्याने‎ तालुक्यातील राजकीय समिकरण‎ बदलणार असून ठाकरे यांच्या‎ दौऱ्याकडे पैठणमधील विरोधकांचे ‎लक्ष लागले आहे. पैठणसह ‎जिल्ह्यातील युतीच्या सर्व जागांवर‎ पुन्हा आमचे वर्चस्व राहिल असे‎ भुमरे यांनी सांगितले. एकीकडे‎ विधानसभेसाठी सचिन घायाळ‎ दावेदारी करत आहे.तर दुसरीकडे ‎भुमरे आता खासदार झाल्याने त्यांचे ‎पुत्र विलास भुमरे विधानसभा ‎लढणार आहेत. असा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा उद्धव ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे सकाळी 10 वाजता मुंबईहून खासगी विमानाने शिर्डीला रवाना होणार आहेत. 11 वाजता शिर्डी संस्थान येथे श्री साईबाबांचे दर्शन ते घेणार आहेत. त्यानंतर ते मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी ते शिर्डीहून वैजापूरकडे रवाना होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. वैजापुरात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत काही जणांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. यानंतर उद्धव ठाकरे पैठणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे सचिन घायाळ यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. उद्धव ठाकरे कुणावर साधणार निशाणा? विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांचा दौरा होत असल्याने, ठाकरे आज कुणावर निशाणा साधतात? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. उद्धव ठाकरे दौरा करत असलेल्या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेत बंडखोर झाली होती.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment