उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना जनतेला काय दिले?:बावनकुळे यांचा पलटवार; औरंगजेब फॅन क्लबचे म्होरक्या असल्याची टीका

भाजपने सौगात ए मोदी ही योजना सुरू केली आहे. पण ही योजना सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता आहे. बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात ए मोदी म्हणत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यत्तर दिले आहे. हिंदुत्व आमच्या डीएनए मध्येच आहे. पण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा त्याग केला आणि आता ते औरंगजेब फॅन क्लबचे म्होरक्या झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. मोदी सुरुवातीला मंगळसूत्र धोक्यात आहे, आता हिंदूंचे संरक्षण कोण करणार? असे म्हणाले हेाते. जे लोक आमच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत ते आता काय म्हणतील. भाजपने आता आपण हिंदुत्व सोडल्याची घोषणा करावी. भाजपने प्रथम विष वाटले, आता धान्य वाटत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी आपले हिंदुत्व सोडले का किंवा त्यांची ही योजना केवळ बिहार निवडणुकीपर्यंत राहणार का? हे भाजपने स्पष्ट करावे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर आता बावनकुळे यांनी पलटवार केला आहे. हिंदुत्वावर बोलण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार उरलेला नाही
या संदर्भात बावनकुळे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यामध्ये ते म्हणाले की, ‘हिंदुत्व आमच्या डीएनए मध्येच आहे. पण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा त्याग केला. आणि आता ते औरंगजेब फॅन क्लबचे म्होरक्या झाले आहेत. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वारसा सोडून काँग्रेसच्या दारात जाऊन बसले. त्यामुळेच जनतेने तुम्हाला घरी बसण्याचे तुमचे आवडते काम दिले. आता हिंदुत्वावर बोलण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार उरलेला नाही. भाजपचा “सौगात-ए-मोदी” हा कार्यक्रम नाही, ही विकासाची गॅरंटी आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने देशाला 24 तास वीज, पाणी, रस्ते, घरं आणि रोजगार दिला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या जनतेला काय दिले? मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर असताना ते घरात बसून राहिले आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांशी नाळ तोडून टाकली. अहोरात्र जनसेवेचा ध्यास घेऊन देशसेवा करणाऱ्या मोदीजींवर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची पात्रता नाही. गुन्हेगार, बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या आणि समाजविघातक तत्त्वांना सरंक्षण देणाऱ्या प्रवृत्तींचा मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी कायद्याच्या मार्गाने व्यवस्थित बंदोबस्त करीत आहेत. पण आता हेच लोकं उद्धव ठाकरेंना का प्रिय झाले आहेत? याची उत्तरं आधी त्यांनी जनतेला द्यावीत. अशी मागणी देखील बावनकुळे यांनी केली आहे. काय म्हणाले होते उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपने सौगात ए मोदी ही योजना सुरू केली आहे. पण ही योजना सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता आहे. बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात ए मोदी म्हणत आहेत. मोदी सुरुवातीला मंगळसूत्र धोक्यात आहे, आता हिंदूंचे संरक्षण कोण करणार? असे म्हणाले. जे लोक आमच्या हिंदुत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत ते आता काय म्हणतील. भाजपने आता आपण हिंदुत्व सोडल्याची घोषणा करावी. भाजपने प्रथम विष वाटले, आता धान्य वाटत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी आपले हिंदुत्व सोडले का किंवा त्यांची ही योजना केवळ बिहार निवडणुकीपर्यंतच राहणार का? हे भाजपने स्पष्ट करावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. एकीकडे हे सौगात ए मोदी अभियान राबवत आहेत. तर दुसरीकडे नमाजावर बंदी घालत आहेत. ही बंदी नितीशकुमार यांच्या बिहारमध्येही घालणार काय? भाजपने हिंदुत्व सोडले की, हे केवळ निवडणुकीचे नाटक आहे? असा प्रश्न ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.