यूपीएसची 50% गॅरंटेड निवृत्ती वेतन योजना 1 एप्रिलपासून लागू:ऑगस्टमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली होती मंजुरी
केंद्र सरकारने राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली (एनपीएस) अंतर्गत समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेल्या एकीकृत निवृत्ती वेतन योजना (यूपीएस) ची अधिसूचना शनिवारी जारी केली. एक एप्रिलपासून लागू होणाऱ्या या योजनेत एनपीएसचा पर्यायही देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना यूपीएसचा पर्याय द्यावा लागणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या ५० टक्के निवृत्ती वेतनाची हमी यामध्ये देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी २४ ऑगस्ट रोजी त्याला मंजुरी दिली होती. यूपीएसमध्ये १० हजार रुपयांच्या किमान निवृत्ती वेतनाची हमी आहे. यूपीएसचा पर्याय निवडणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीसाठी जमा केलेल्या रकमेची दोन भागात विभागणी केली जाईल. कर्मचारी आणि केंद्र सरकार मूळ वेतन आणि महागाई भत्त्यातील १०-१० टक्के रक्कम व्यक्तिगत निधीत जमा करतील. संयुक्त निधीत ८.५ % अतिरिक्त रक्कम केंद्र सरकार जमा करणार आहे. व्यक्तिगत निधीत गुंतवणुकीचा पर्याय ज्यांनी निवडलेला नाही त्या कर्मचाऱ्यांसाठी ‘डिफॉल्ट गुंतवणूक पॅटर्न’ची एनपीएस योजना लागू असेल. विद्यमान कॅबिनेट सचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने एनपीएससंदर्भात शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या चिंता मिटवण्याच्या दृष्टीने यूपीएसचा पर्याय सुचवला होता.
25 वर्षे नोकरी : ८० हजार वेतन- ४० हजार पेन्शन २५ वर्षे सेवेतील शेवटच्या १२ महिन्यांचे मूळ वेतन ८०, ००० व सेवा अवधीत निधीतून पैसा काढलेला नसल्यास कॉर्पस फंड १ करोड़ रुपये होईल. मग पेन्शन अशी- 80,000/2×300/300×1 कोटी /1 कोटी = 40,000 रु. प्रतिमाह+महागाई दिलासा मिळू शकतो. ‘यूपीएस’ पेन्शनची गणना अशी… पेन्शनची गणना अंतिम १२ महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनावर होईल. २५ वर्षांचा एकूण किमान सेवा कालावधी म्हणजे ३०० महिन्यांचा बेंचमार्क मानला जाईल. जो कर्मचारी २५ वर्षांहून जास्त सेवा देईल त्याच्या पेन्शनची गणनाही २५ वर्षे बेंचमार्कवर होईल. जो कमी काळात निवृत होतील, याच फॉर्म्युल्याद्वारे पेन्शन कमी होईल. पात्रता काळ आणि अंशदान बेंचमार्कच्या अनुरूप असल्यास अंतिम १२ महिन्यांच्या मूळ वेतनाच्या ५०% रक्कम पेन्शनमध्ये मिळेल. निवृत्तीनंतर मिळणारी एकमुस्त रक्कम… 80 हजार मासिक वेतन आणि सेवानिवृत्तीवेळी य 50% महागाई भत्त्यासह एकूण वेतन 1,20,000 रु. होईल. त्याचा 1/10 वा हिस्सा 12,000 रु. झाला. 15 वर्षे सेवेचा 2 ने गुणाकार केल्यास 30 होईल. ही गणना सेवा कालावधी (6-6 महिने) च्या आधारावर केली जाते. सेवा कालावधी 15 वर्षे असेल तर ६ महिन्यांच्या हिशेबाने 30 होतील। एकमुस्त रक्कम 12,000 x 30=3,60,000 रु. सेवा कालावधी पूर्ण झालेल 6 महीने रक्कम 20 वर्षे (240 महीने) 40 X 12000 4,80,000
25 वर्षे (300 महीने) 50×12000 6,00,000
30 वर्षे (360 महीने) 60×12000 7,20,000 सेवा अवधी १५ वर्षे (१८० महिना)व शेवटचे १२ महिने सरासरी वेतन ८० हजार असल्यास बेंचमार्क व व्यक्तिगत काॅर्पस 42-42 लाख रु. होईल. त्यानुसार पेन्शन- 80,000/2×180/300×42 लाख/42 लाख= 24,000 रु. प्रतिमाह+महागाई दिलासा मिळेल. सेवाअवधी 10 वर्ष असल्यास पात्रता सेवेचा काळ 120 महिने असेल. बेंचमार्क व व्यक्तिगत काॅर्पस फंड 30-30 लाख रुपये असेल. या हिशेबाने सेवानिवृत्ती वेतन प्रतिमहिना 16,000 रुपये +महागाई दिलासाही मिळेल.