विकास:जागतिक दर्जाच्या मनोरंजनासाठी गुजरातच्या अहमदाबादेत उभारणार इमॅजिका थीम पार्क
देशातील दुसरे सर्वात मोठे मनोरंजन थीम पार्क अहमदाबादमध्ये होत आहे. जागतिक दर्जाच्या मनोरंजनासाठी प्रसिद्ध असलेले इमॅजिकाचे थीम पार्क साबरमती नदीवर पाच लाख चौरस फूट रिव्हरफ्रंटवर उभारले जाणार आहे. पुण्यातील इमॅजिका वर्ल्ड आणि साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एसआरएफडीसीएल) यांच्यातही याबाबतचा करार झाला आहे. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठीचा अर्ज एनजीटीकडे आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली येथे इमॅजिकाचे थीम पार्क हे देशातील सर्वात मोठे (६० लाख चौरस फूट) थीम पार्क आहे. एनजीटीकडून ग्रीन सिग्नल मिळताच या उद्यानाचे काम तीन ते चार महिन्यांत सुरू होईल. हे थीम पार्क दोन टप्प्यात होईल. पहिला टप्पा आठ ते १० महिन्यांत पूर्ण होईल. इमॅजिका ग्रुपचा हा प्रकल्प ३०० कोटी रुपयांचा असेल. इमॅजिकाला या थीम पार्कसाठी साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर जमीन दिली आहे. या जमिनीचे वार्षिक भाडे ४५.६० लाख रुपये असेल. दर तीन वर्षांनी हे भाडे १०% ने वाढवले जाईल. भाड्याव्यतिरिक्त साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला इमॅजिका वर्ल्डच्या कमाईतून दरवर्षी १२.२५% वाटा देखील मिळेल. दोन आंतरराष्ट्रीय सहकार्यातून जागतिक मनोरंजन डेव्ह अँड बस्टर: ही अमेरिकन कंपनी हाय-टेक गेमिंग आणि मनोरंजन रेस्टॉरंट चेन चालवते. इमॅजिकाच्या मालपाणी ग्रुपशी त्यांनी करार केला आहे. त्यांची जगभरात १५६ पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. किडझानिया: मेक्सिकन कंपनीचे २७ देशांमध्ये आउटलेट आहेत. मुंबईनंतर देशात अहमदाबादमध्ये दिसणार आहे. १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना खेळ पुरवले जातात. ५ झोनमध्ये इमॅजिका; प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य
झोन-१… मुख्य प्रवेशद्वार आणि वाहन सोडण्याची जागा असेल. ते पूर्णपणे खुले असेल. पाच हजार लोकांसाठी जागा असेल. तुम्ही बागेच्या वॉकवेवरून आत जाल.
झोन-२… तिकीट खिडकी असेल. त्याच्या छतावर फेरीस व्हील असेल. तिकीट घेतल्यावर कोणीही थेट फेरीस व्हील पाहू शकतो. फेरीस व्हीलची उंची ६६ मीटर असेल.
झोन-३… ५०० वाहनांची पार्किंग असेल. आंतरराष्ट्रीय ब्रँड डेव्ह बस्टरचे इनडोअर एंटरटेनमेंट स्टोअर असेल. जे कंपनीचे देशातील दुसरे आऊटलेट असेल.
झोन-४… एक स्नो पार्क असेल. उणे ५ अंशांमध्ये अनेक स्लाइड्स असतील. शिवाय रॉक क्लायंबिंग वॉल असेल. बर्फाने झाकलेले कृत्रिम पर्वत व डान्स फ्लोरही असेल.
झोन-५… सर्व वयोगटातील लोकांसाठी रोमांचक मनोरंजन ड्राइव्ह असेल. येथे दाेन रेस्टॉरंट असतील. ट्रॅम्पोलिन पार्क, गो कार्ट, सॉफ्ट प्ले एरिया, रोलर कोस्टर इत्यादी तयार केले जातील.