विदर्भात भाजपला मोठे खिंडार:माजी आमदार गोपालदास अग्रवाल कॉंग्रेसमध्ये परतणार

विदर्भात भाजपला मोठे खिंडार:माजी आमदार गोपालदास अग्रवाल कॉंग्रेसमध्ये परतणार

विदर्भातील भाजपची ताकद कमी करण्याचे प्रयत्न महाविकास आघाडी करत असून त्यांच्या या प्रयत्नांना यश देखील मिळत असल्याचे दिसत आहे. गोंदिया जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच ते पुन्हा एकदा कॉंग्रेसमध्ये परतणार असल्याचे समोर आले आहे. माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे, येत्या 13 सप्टेंबर रोजी ते काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला आणि प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच गोपालदास अग्रवाल महायुती सरकार सत्तेत आल्यापासूनच नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र गोंदिया जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांना पालकमंत्री बाबा आत्राम यांनी बोलण्याची संधी दिली नसल्याने त्यांनी तडकाफडकी भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. गोंदिया जिल्हा नियोजन समितीची बैठक 14 ऑगस्ट रोजी झाली होती. या बैठकीत जिल्ह्यातील विविध समस्या आणि इतर मुद्यांवर त्यांनी बोलण्यासाठी वेळ मागून घेतला होता. पण बैठकीत पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांना बोलू दिले नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर अग्रवाल यांनी तातडीने नियोजन समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच या प्रकरणाची तक्रार त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील केली होती. कोण आहेत गोपालदास अग्रवाल?
गोपाल अग्रवाल हे काँग्रेसकडून 2 वेळा विधान परिषदवर आमदार तर तीनदा ते विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत. 2019 मध्ये त्यांनी राजकीय हवा कोणत्या दिशेला वाहत आहे, त्याचा अंदाज घेत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह ते भाजपमध्ये दाखल झाले. आता ते 13 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

​विदर्भातील भाजपची ताकद कमी करण्याचे प्रयत्न महाविकास आघाडी करत असून त्यांच्या या प्रयत्नांना यश देखील मिळत असल्याचे दिसत आहे. गोंदिया जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच ते पुन्हा एकदा कॉंग्रेसमध्ये परतणार असल्याचे समोर आले आहे. माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे, येत्या 13 सप्टेंबर रोजी ते काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला आणि प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच गोपालदास अग्रवाल महायुती सरकार सत्तेत आल्यापासूनच नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र गोंदिया जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांना पालकमंत्री बाबा आत्राम यांनी बोलण्याची संधी दिली नसल्याने त्यांनी तडकाफडकी भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. गोंदिया जिल्हा नियोजन समितीची बैठक 14 ऑगस्ट रोजी झाली होती. या बैठकीत जिल्ह्यातील विविध समस्या आणि इतर मुद्यांवर त्यांनी बोलण्यासाठी वेळ मागून घेतला होता. पण बैठकीत पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांना बोलू दिले नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर अग्रवाल यांनी तातडीने नियोजन समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच या प्रकरणाची तक्रार त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील केली होती. कोण आहेत गोपालदास अग्रवाल?
गोपाल अग्रवाल हे काँग्रेसकडून 2 वेळा विधान परिषदवर आमदार तर तीनदा ते विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत. 2019 मध्ये त्यांनी राजकीय हवा कोणत्या दिशेला वाहत आहे, त्याचा अंदाज घेत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह ते भाजपमध्ये दाखल झाले. आता ते 13 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment