राहुल गांधी काय म्हणाले ते देखील आधी सांगा:राज्यातील काँग्रेसच्या आंदोलनाआधीच भाजप खासदार अनिल बोंडे यांचे आव्हान

राहुल गांधी काय म्हणाले ते देखील आधी सांगा:राज्यातील काँग्रेसच्या आंदोलनाआधीच भाजप खासदार अनिल बोंडे यांचे आव्हान

काँग्रेसला माझ्या विरोधात आंदोलन करायचे असेल तर त्यावर मला काहीही म्हणायचे नाही. मात्र, आंदोलन करण्याआधी राहुल गांधी काय म्हणाले होते, ते देखील जनतेला सांगावे, असे आव्हान खासदार अनिल बोंडे यांनी दिले आहे. राहुल गांधी यांच्या जिभेला चटके द्यायला हवे, अनिल बोंडे यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर आता काँग्रेसच्या वतीने त्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. यावर अनिल बोंडे यांनी देखील पलटवार केला आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील आरक्षण संपवण्याची भाषा केली होती. भारतामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवणार, जातीनिहाय जनगणना करणार, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता. एकिकडे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा दावा करायचा आणि दुसरीकडे अमेरिकेममध्ये जात आरक्षण संपवण्याची भाषा ते करत आहे. असा आरोप देखील बोंडे यांनी केला आहे. काँग्रेसने माझ्याविरुद्ध आंदोलन निश्चित करावे त्यांच्या आंदोलनावर मला काही म्हणायचे नाही. मात्र, राहुल गांधी आरक्षणावर काय म्हणाले होते, हे देखील जनतेचा सांगावे, असे आवाहन देखील खासदार बोंडे यांनी दिले आहे. आरक्षणाच्या मुद्यावर वादग्रस्त विधान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटू नका, तिला केवळ चटके द्या, असे वादग्रस्त विधान भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या आमदारानंतर भाजप खासदार बोंडे यांनी असे विधान केल्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात आरक्षणाच्या मुद्यावर कथित वादग्रस्त विधान केले होते. देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील, तेव्हा काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मुद्यावर विचार करेन. पण सध्या भारतात अशी कोणतीही परिस्थिती नाही, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांची जीभ छाटणाऱ्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिभेला चटके देण्याची मागणी केली होती. जिभेला चटके देण्याची गरज – अनिल बोंडे अनिल बोंडे म्हणाले होते की, आमदार संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाही. पण राहुल गांधी यांनी आरक्षणावर केलेले विधान अतिशय भयानक आहे. कुणी परदेशात जाऊन असे वात्रटासारखे बोलत असेल तर त्याची जीभ छाटू नये, तर त्याच्या जिभेला चटके द्यावेत. अशा लोकांच्या जिभेला चटके देण्याची फार गरज असते. अनिल बोंडे यांनी यावेळी पत्रकार ज्ञानेश महाराव व अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते श्याम मानव यांच्यावरही निशाणा साधला होता. भारतातील बहुसंख्यकांच्या भावना दुखावणाऱ्या लोकांना किमान त्यांच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी त्यांची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके निश्चितपणे दिले पाहिजे, असे ते म्हणाले. युवक काँग्रेसचे आंदोलन भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात बुधवारी आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे काँग्रेस व भाजप असा नवा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संतप्त युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार बोंडे यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावेळी तीव्र नारेबाजी करीत डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रतीकात्मक पोस्टरला चपलांनी बदडले. तसेच कारवाईची मागणी रेटून धरली आहे. यावेळी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी बोंडेच्या घरापुढे तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. विजय वडेट्टीवार यांचा पलटवार दुसरीकडे, काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अनिल बोंडे यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला होता. ते म्हणाले, संविधान रक्षणाची भाषा करणारे, जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करणारे आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या जीभेला चटके देण्याची भाषा आता भाजपचे राज्यसभा अनिल बोंडे यांनी केली आहे. महायुती मधील नेत्यांची तोंडाची गटार बंद होत नाही. एका मागून एक महायुतीचे नेते आमचे नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत. संविधान वाचवण्याची भूमिका आणि जातनिहाय जनगणनेची मागणी राहुलजी गांधींनी घेतल्यामुळे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना राजकीय चटके बसत आहेत. म्हणूनच खासदार अनिल बोंडे आणि आमदार संजय गायकवाड नैराश्यामुळे राहुल गांधी बद्दल अशी भाषा वापरत आहे. आता पाहू काय म्हणाले होते संजय गायकवाड? राहुल गांधी यांच्या आरक्षणावरील विधानावर भाष्य करताना आमदार संजय गायकवाड म्हणाले होते की, महाराष्ट्रात व देशात आरक्षणाच्या मागणीसाठी आग लागली आहे. मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीने उभे करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी व इतर प्रवर्गांना आरक्षणाची तरतूद केली. असे असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याचे विधान केले. या माध्यमातून त्यांनी काँग्रेसचा खरा चेहरा व पोटातील मळमळ ओकून दाखवली. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत आरक्षण व संविधान धोक्यात असल्याचे फेक नरेटिव्ह पसरवले. त्यातून त्यांनी दिनदुबळ्या समाजाची मते घेतली. त्यानंतर आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करत आहेत. याचा अर्थ त्यांना सर्वच मागासवर्ग, आदिवासी, दलित व इतरांचे आरक्षण संपवायचे आहे. त्यामुळे आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास मी 11 लाख रुपयांचे बक्षीस देईल, असे ते म्हणाले होते. राज्यातील इरतही महत्त्वाच्या बातम्या वाचा… सकाळचे प्रदूषण कमी झाले पाहिजे:नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संजय राऊतांना टोला; स्वच्छता अभियान पंधरवड्याचा शुभारंभ सकाळी होणारे प्रदूषण कमी व्हायला पाहिजे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. राज्यस्तरीय स्वच्छता अभियान पंधरवड्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. पूर्ण बातमी वाचा… तिसऱ्या आघाडीत प्रकाश आंबेडकर आणि जरांगे यांना सोबत घेण्याचे प्रयत्न:राजू शेट्टी यांचे बैठकीआधी आश्वासक आघाडी देण्याचे संकेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थापन करण्यात येणाऱ्या तिसऱ्या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना देखील घेण्याचा प्रयत्न असल्याची माहिती शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. तिसऱ्या आघाडीबाबत निर्णय घेण्यासाठी आज पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीआधी राजू शेट्टी आणि माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. पूर्ण बातमी वाचा… मृत्यूच्या आधी जय कोणासोबत होता? त्याला कुठे-कुठे नेण्यात आले?:सर्वांचे कॉल डिटेल चेक करण्याची मिटकरींची मागणी मनसे कार्यकर्ते जय मालोकरच्या मृत्यूप्रकरणी आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. मृत्यूच्या आधीचे जय नेमका कोणासोबत होता? त्याला कुठे कुठे नेण्यात आले? त्याच्यासोबतच्या सर्वांचे कॉल डिटेल चेक करा आणि ते न्यायला द्या, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. अमोल मिटकरी यांनी आधी देखील या प्रकरणात मनसे नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता हा वाद पुन्हा एकदा वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्ण बातमी वाचा…

​काँग्रेसला माझ्या विरोधात आंदोलन करायचे असेल तर त्यावर मला काहीही म्हणायचे नाही. मात्र, आंदोलन करण्याआधी राहुल गांधी काय म्हणाले होते, ते देखील जनतेला सांगावे, असे आव्हान खासदार अनिल बोंडे यांनी दिले आहे. राहुल गांधी यांच्या जिभेला चटके द्यायला हवे, अनिल बोंडे यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर आता काँग्रेसच्या वतीने त्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. यावर अनिल बोंडे यांनी देखील पलटवार केला आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील आरक्षण संपवण्याची भाषा केली होती. भारतामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवणार, जातीनिहाय जनगणना करणार, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता. एकिकडे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा दावा करायचा आणि दुसरीकडे अमेरिकेममध्ये जात आरक्षण संपवण्याची भाषा ते करत आहे. असा आरोप देखील बोंडे यांनी केला आहे. काँग्रेसने माझ्याविरुद्ध आंदोलन निश्चित करावे त्यांच्या आंदोलनावर मला काही म्हणायचे नाही. मात्र, राहुल गांधी आरक्षणावर काय म्हणाले होते, हे देखील जनतेचा सांगावे, असे आवाहन देखील खासदार बोंडे यांनी दिले आहे. आरक्षणाच्या मुद्यावर वादग्रस्त विधान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटू नका, तिला केवळ चटके द्या, असे वादग्रस्त विधान भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या आमदारानंतर भाजप खासदार बोंडे यांनी असे विधान केल्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात आरक्षणाच्या मुद्यावर कथित वादग्रस्त विधान केले होते. देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील, तेव्हा काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मुद्यावर विचार करेन. पण सध्या भारतात अशी कोणतीही परिस्थिती नाही, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांची जीभ छाटणाऱ्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिभेला चटके देण्याची मागणी केली होती. जिभेला चटके देण्याची गरज – अनिल बोंडे अनिल बोंडे म्हणाले होते की, आमदार संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाही. पण राहुल गांधी यांनी आरक्षणावर केलेले विधान अतिशय भयानक आहे. कुणी परदेशात जाऊन असे वात्रटासारखे बोलत असेल तर त्याची जीभ छाटू नये, तर त्याच्या जिभेला चटके द्यावेत. अशा लोकांच्या जिभेला चटके देण्याची फार गरज असते. अनिल बोंडे यांनी यावेळी पत्रकार ज्ञानेश महाराव व अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते श्याम मानव यांच्यावरही निशाणा साधला होता. भारतातील बहुसंख्यकांच्या भावना दुखावणाऱ्या लोकांना किमान त्यांच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी त्यांची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके निश्चितपणे दिले पाहिजे, असे ते म्हणाले. युवक काँग्रेसचे आंदोलन भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात बुधवारी आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे काँग्रेस व भाजप असा नवा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संतप्त युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार बोंडे यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावेळी तीव्र नारेबाजी करीत डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रतीकात्मक पोस्टरला चपलांनी बदडले. तसेच कारवाईची मागणी रेटून धरली आहे. यावेळी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी बोंडेच्या घरापुढे तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. विजय वडेट्टीवार यांचा पलटवार दुसरीकडे, काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अनिल बोंडे यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला होता. ते म्हणाले, संविधान रक्षणाची भाषा करणारे, जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करणारे आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या जीभेला चटके देण्याची भाषा आता भाजपचे राज्यसभा अनिल बोंडे यांनी केली आहे. महायुती मधील नेत्यांची तोंडाची गटार बंद होत नाही. एका मागून एक महायुतीचे नेते आमचे नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत. संविधान वाचवण्याची भूमिका आणि जातनिहाय जनगणनेची मागणी राहुलजी गांधींनी घेतल्यामुळे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना राजकीय चटके बसत आहेत. म्हणूनच खासदार अनिल बोंडे आणि आमदार संजय गायकवाड नैराश्यामुळे राहुल गांधी बद्दल अशी भाषा वापरत आहे. आता पाहू काय म्हणाले होते संजय गायकवाड? राहुल गांधी यांच्या आरक्षणावरील विधानावर भाष्य करताना आमदार संजय गायकवाड म्हणाले होते की, महाराष्ट्रात व देशात आरक्षणाच्या मागणीसाठी आग लागली आहे. मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीने उभे करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी व इतर प्रवर्गांना आरक्षणाची तरतूद केली. असे असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याचे विधान केले. या माध्यमातून त्यांनी काँग्रेसचा खरा चेहरा व पोटातील मळमळ ओकून दाखवली. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत आरक्षण व संविधान धोक्यात असल्याचे फेक नरेटिव्ह पसरवले. त्यातून त्यांनी दिनदुबळ्या समाजाची मते घेतली. त्यानंतर आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करत आहेत. याचा अर्थ त्यांना सर्वच मागासवर्ग, आदिवासी, दलित व इतरांचे आरक्षण संपवायचे आहे. त्यामुळे आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास मी 11 लाख रुपयांचे बक्षीस देईल, असे ते म्हणाले होते. राज्यातील इरतही महत्त्वाच्या बातम्या वाचा… सकाळचे प्रदूषण कमी झाले पाहिजे:नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संजय राऊतांना टोला; स्वच्छता अभियान पंधरवड्याचा शुभारंभ सकाळी होणारे प्रदूषण कमी व्हायला पाहिजे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. राज्यस्तरीय स्वच्छता अभियान पंधरवड्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. पूर्ण बातमी वाचा… तिसऱ्या आघाडीत प्रकाश आंबेडकर आणि जरांगे यांना सोबत घेण्याचे प्रयत्न:राजू शेट्टी यांचे बैठकीआधी आश्वासक आघाडी देण्याचे संकेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थापन करण्यात येणाऱ्या तिसऱ्या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना देखील घेण्याचा प्रयत्न असल्याची माहिती शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. तिसऱ्या आघाडीबाबत निर्णय घेण्यासाठी आज पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीआधी राजू शेट्टी आणि माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. पूर्ण बातमी वाचा… मृत्यूच्या आधी जय कोणासोबत होता? त्याला कुठे-कुठे नेण्यात आले?:सर्वांचे कॉल डिटेल चेक करण्याची मिटकरींची मागणी मनसे कार्यकर्ते जय मालोकरच्या मृत्यूप्रकरणी आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. मृत्यूच्या आधीचे जय नेमका कोणासोबत होता? त्याला कुठे कुठे नेण्यात आले? त्याच्यासोबतच्या सर्वांचे कॉल डिटेल चेक करा आणि ते न्यायला द्या, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. अमोल मिटकरी यांनी आधी देखील या प्रकरणात मनसे नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता हा वाद पुन्हा एकदा वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्ण बातमी वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment