पुण्याच्या आयटी कंपनीत दहशतवादी घुसला!:खोटी माहिती देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

पुण्याच्या आयटी कंपनीत दहशतवादी घुसला!:खोटी माहिती देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

गणेशोत्सवाच्या धामधुमीमध्ये आयटी कंपनीमध्ये बंदूकधारी दहशतवादी शिरला असल्याची खोटी माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला देणाऱ्या विरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. प्रदीप पंडित चव्हाण (वय 30, रा. एस आर ए बिल्डिंग दत्त मंदिरचौक, विमान नगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रदीपने पुणे शहर पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून, हयात हॉटेल समोरील आयटी पार्कमध्ये एक व्यक्ती बंदूक घेऊन शिरल्याची माहिती दिली. तो तेथील व्यक्तींना त्रास देत असून, संबंधित हा आतंकवादी असून तात्काळ पोलिस मदत पाठवा, असे सांगितले. पोलीस नियंत्रण कक्षाने तात्काळ याची माहिती येरवडा पोलिसांना दिल्यानंतर तातडीने घटनास्थळी रात्रगस्त अधिकारी व अंमलदार रवाना झाले. मात्र घटनास्थळी तसा कोणताही प्रकार नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संपूर्ण माहिती घेतल्यावर पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी खोटी माहिती देणारा आरोपी प्रदीप चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. खोटी माहिती देऊ नका, पोलिसांचे आवाहन ऐन सणासुदीच्या काळात पोलिस यंत्रणेवर मोठा ताण असतो. त्यातच नियंत्रण कक्षाला अशा प्रकारे खोटे फोन करून त्रास देणे चुकीचे आहे. अशाप्रकारे गंभीर स्वरूपाची खोटी चुकीची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिल्यामुळे संबंधित आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.

​गणेशोत्सवाच्या धामधुमीमध्ये आयटी कंपनीमध्ये बंदूकधारी दहशतवादी शिरला असल्याची खोटी माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला देणाऱ्या विरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. प्रदीप पंडित चव्हाण (वय 30, रा. एस आर ए बिल्डिंग दत्त मंदिरचौक, विमान नगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रदीपने पुणे शहर पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून, हयात हॉटेल समोरील आयटी पार्कमध्ये एक व्यक्ती बंदूक घेऊन शिरल्याची माहिती दिली. तो तेथील व्यक्तींना त्रास देत असून, संबंधित हा आतंकवादी असून तात्काळ पोलिस मदत पाठवा, असे सांगितले. पोलीस नियंत्रण कक्षाने तात्काळ याची माहिती येरवडा पोलिसांना दिल्यानंतर तातडीने घटनास्थळी रात्रगस्त अधिकारी व अंमलदार रवाना झाले. मात्र घटनास्थळी तसा कोणताही प्रकार नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संपूर्ण माहिती घेतल्यावर पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी खोटी माहिती देणारा आरोपी प्रदीप चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. खोटी माहिती देऊ नका, पोलिसांचे आवाहन ऐन सणासुदीच्या काळात पोलिस यंत्रणेवर मोठा ताण असतो. त्यातच नियंत्रण कक्षाला अशा प्रकारे खोटे फोन करून त्रास देणे चुकीचे आहे. अशाप्रकारे गंभीर स्वरूपाची खोटी चुकीची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिल्यामुळे संबंधित आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment