Monthly Archive: November, 2024

हिंगोलीतील सखी मतदान केंद्र गुलाबी रंगाने सजले:महिला कर्मचाऱ्यांचे ड्रेसकोडही गुलाबी रंगाचे, मतदारांनी मतदानानंतर घेतली सेल्फी

हिंगोलीतील सखी मतदान केंद्र गुलाबी रंगाने सजले:महिला कर्मचाऱ्यांचे ड्रेसकोडही गुलाबी रंगाचे, मतदारांनी मतदानानंतर घेतली सेल्फी

हिंगोली शहरातील सीटीक्लबच्या मैदानावरील सखी मतदान केंद्रावर बुधवारी ता. २० अल्हाददायक चित्र होते. मतदान केंद्र गुलाबी रंगाच्या फुग्यांनी सजविले होते तर केंद्रामध्ये गुलाबी पुष्पगुच्छ ठेवण्यात आले होते. तर या केंद्रावर नियुक्त केलेल्या महिला कर्मचाऱ्यांचे ड्रेसकोड देखील गुलाबी रंगाचे होते. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांचे स्वागत केले जात असल्याचे चित्र होते. या मतदान केंद्रावर अल्हाददायक चित्र पहावयास मिळाले. हिंगोली जिल्हयात यावर्षी प्रशासनाने...

विधानसभा निवडणुकीत बीड सर्वात जास्त चर्चेत:बोगस मतदान तर कुठे थेट हाणामारी, जिल्ह्यात कुठे कुठे काय झाले?

विधानसभा निवडणुकीत बीड सर्वात जास्त चर्चेत:बोगस मतदान तर कुठे थेट हाणामारी, जिल्ह्यात कुठे कुठे काय झाले?

बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक मतदार संघामध्ये सुरळीतपणे मतदान प्रक्रिया दुपारपर्यंत पार पडली. मात्र दुपारनंतर परळी व आष्टी येथील मतदान केंद्रांवर घोळ सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. याचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. परळी येथील मतदान केंद्राच्या बाहेरच बोटाला शाई लाऊन परत पाठवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर आष्टी येथे भाजप व राष्ट्रवादी...

हिवाळ्यात 31% वाढतो हृदयविकाराचा धोका:थंडीत हृदयाची काळजी कशी घ्यावी, डॉक्टरांनी सांगितल्या 12 खबरदारी

हिवाळ्यात हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. असे घडते कारण थंडीत शरीर उबदार ठेवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. ज्यांना आधीच हृदयरोग किंवा हृदयाशी संबंधित आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी हे अधिक धोकादायक असू शकते. पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, ज्यांना आधीच हृदयविकार आहे त्यांच्यामध्ये थंडीत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 31% वाढतो. त्यामुळे थंडीच्या काळात हृदयाला अतिरिक्त काळजी घ्यावी...

मतदानकेंद्रावर रामदास आठवले यांच्यासोबत भेदभाव!:संतप्त समर्थकांनी केली निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

मतदानकेंद्रावर रामदास आठवले यांच्यासोबत भेदभाव!:संतप्त समर्थकांनी केली निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत भेदभाव झाला असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. वांद्रे येथील मतदान केंद्रावर रामदास आठवले यांच्यासोबत दुजाभाव झाला असल्याचे बोलले जात आहे. रामदास आठवले दुपारच्यावेळी वांद्रे पूर्व येथील गांधीनगर परिसरातील नवजीवन विद्या मंदिर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले होते. यावेळी मतदान केंद्रावर अनेक उमेदवार व नेत्यांचे फोटो काढण्यात...

अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू:बीडमधील हृदयद्रावक घटना; छत्रपती शाहू विद्यालयात आढावा घेताना चक्कर येऊन पडले

अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू:बीडमधील हृदयद्रावक घटना; छत्रपती शाहू विद्यालयात आढावा घेताना चक्कर येऊन पडले

बीड विधानसभा मतदारसंघात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर हा प्रकार समोर आला आहे. त्यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली पडले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे....

प्रणिती शिंदे भाजपची B टीम:शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी, अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाचा हल्लाबोल

प्रणिती शिंदे भाजपची B टीम:शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी, अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाचा हल्लाबोल

प्रणिती शिंदे या भाजपच्या बी टीम म्हणून काम करत असून त्यांनी भाजपसोबत आतून हातमिळवणी केली असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केला आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज कडादी यांना मतदानाच्या दिवशी पाठिंबा जाहीर केला असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोली यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शरद कोळी म्हणाले, शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी...

गुजरातमध्ये रॅगिंग, MBBS च्या विद्यार्थ्याचा मृत्यू:कुटुंबीय म्हणाले – अशी मानसिकता असलेले लोक डॉक्टर कसे होऊ शकतात?

गुजरातमधील पाटण जिल्ह्यात रॅगिंगमुळे एका विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी धारपूर मेडिकल कॉलेजच्या १५ ज्येष्ठ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांना कॉलेजमधून निलंबितही करण्यात आले आहे. सोमवारी पोलिसांनी सर्वांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने 1 दिवसाची कोठडी मंजूर केली आहे. आज पोलिस पुन्हा आरोपी विद्यार्थ्यांना न्यायालयात हजर करणार असून रिमांडची मुदत वाढवण्याची मागणी करणार आहेत. कुटुंबीयांनी जन्मठेपेची मागणी केली अनिल मेथानिया हा धारपूर...

विक्रांत मॅसीला मोहन यादव म्हणाले- तुम्ही चांगला चित्रपट बनवला:आज कॅबिनेटसोबत चित्रपट पाहायला जाणार, साबरमती रिपोर्टचा मुख्य अभिनेता आहे विक्रांत

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आज (20 नोव्हेंबर) संध्याकाळी अशोका लेक व्ह्यू येथे त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि आमदारांसह ‘द साबरमती रिपोर्ट’ हा बॉलीवूड चित्रपट पाहणार आहेत. तत्पूर्वी सकाळी मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाचा मुख्य अभिनेता विक्रांत मॅसी याच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. यादरम्यान डॉ.यादव यांनी मॅसीच्या उत्कृष्ट अभिनयाबद्दल त्याचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, आम्ही मध्य प्रदेशातही हा चित्रपट करमुक्त केला आहे....

नांदगावात पैसे वाटप करणारी गाडी पकडली:अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्याने गाडीवर चढत नोटा फाडल्या, पोलिसांकडून वाहन जप्त

नांदगावात पैसे वाटप करणारी गाडी पकडली:अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्याने गाडीवर चढत नोटा फाडल्या, पोलिसांकडून वाहन जप्त

नांदगाव मतदारसंघात सकाळी सुहास कांदे आणि समीर भुजबळ कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदगाव मतदारसंघातील साकोरा येथे पैसे वाटप करणारी गाडी पकडली आहे. अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी पकडली आहे. गाडी पकडल्यानंतर एका कार्यकर्त्याने गाडीच्या टपावर चढून नोटा फाडल्या आणि उधळल्या. मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव मतदारसंघातील साकोरा येथे मतदान केंद्राबाहेर एक गाडी...

कोणत्याही थापांवर विश्वास ठेऊ नका:सुप्रिया सुळे आणि पटोलेंवर बिटकॉइनवरील आरोपांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

कोणत्याही थापांवर विश्वास ठेऊ नका:सुप्रिया सुळे आणि पटोलेंवर बिटकॉइनवरील आरोपांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

खासदीर सुप्रिया सुळे आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर झालेल्या बिटकॉइनवरील आरोपांवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी थापांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले आहे. रवींद्र पाटील तसेच सुधांशु त्रिवेदी यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर पत्रकार परिषद घेत आरोप केले होते. पुण्यातील माजी पोलिस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व...