दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:व्हीआरडीई जवळील उड्डाणपुलामुळे रेल्वे क्रॉसिंगवरील 19 मिनिटे वाचतील

नगर- बीड -परळी या रेल्वे लोहमार्गावरुन जाणाऱ्या नगर- सोलापूर -दौंड महामार्गावरील अरणगाव परिसरातील रेल्वे क्रॉसिंगमुळे या रस्ते मार्गे जाणाऱ्या प्रवाशांना नगर- बीड -परळी रेल्वे क्रॉस होईपर्यंत १९ मिनिटांची प्रतीक्षा करावी लागत होती. आता या रेल्वे क्रॉसिंगवर एक किमीवर चारपदरी उड्डाणपूल झाला आहे. ८ दिवसांपासून या रेल्वे क्रॉसिंग वरील उड्डाणपुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू होते. केवळ ४ स्लॅब टाकणे बाकी आहे. पुढच्या पंधरा दिवसांत हे कामही पूर्ण होईल. जुलै अखेर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे नगर- दौंड-सोलापूर महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांचा क्रॉसिंगवर जाणारा १९ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. अरणगाव परिसरातूनच नगर- बीड- परळी रेल्वे लोहमार्ग जातो. या महामार्गावर हा लोहमार्ग आहे. नगर -बीड -परळी रेल्वे क्रॉसिंग होत असताना या महामार्गावरील प्रवाशांना रेल्वे क्रॉस होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागत होती. . १ एप्रिलपासून या उड्डाणपुलासाठी गर्डर टाकण्याचे काम सुरू होते. उड्डाणपूलावर गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे जुलै अखेर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे या महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांचे १९ मिनिटे वाचणार आहेत. नगर-दौंड मार्गावरील अरणगाव परिसरात तयार झालेला उड्डापणपूल. छाया : मंदार साबळे . उड्डाणपूल परिसरात १३२ केव्हीचे रोहित्र आहे. या उड्डाणपूलावरुन विजेच्या तारा जातात. ते रोहित्र हटवण्यासाठी रेल्वे विभागाने महावितरणला पत्र दिले असून, २ एप्रिलला नगर- बीड- परळी संदर्भात झालेल्या बैठकीतही रोहित्र हटवण्याचे निर्देश महावितरणला दिले. रेल्वे विभागाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र रोहित्रामुळे हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यास विलंब लागत आहे. ४५ कोटी खर्चातून चार पदरी उड्डाणपूल रेल्वे विभागाकडून अरणगाव येथे ४५ कोटी रुपये खर्च करून हा उड्डाणपूल उभा केला जात आहे. शहरापासून ६ किमी अंतरावर हा उड्डाणपूल आहे. ४ पदरी हा उड्डाणपूल आहे. कोल्हापूर, सोलापूर, दौंड, बारामती या जिल्ह्याकडे जाण्यासाठी प्रवाशांना याच मार्गाने जावे लागते. विशेष म्हणजे याच अरणगाव परिसरातच मेहराबाद आहे. येथे देश विदेशातील भाविक दररोज येतात. १३२ केव्ही रोहित्रामुळे काम थांबले