रिक्षासमोर बैल आल्यामुळे‎ अपघात; दोन जणांचा मृत्यू:नांदेडला माहूर-सारखणी रोडवर घडली दुर्घटना‎

रिक्षासमोर बैल आल्यामुळे‎ अपघात; दोन जणांचा मृत्यू:नांदेडला माहूर-सारखणी रोडवर घडली दुर्घटना‎

भरधाव रिक्षासमोर अचानक बैल ‎‎आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ‎‎अपघात झाल्याने दोन जणांचा मृत्यू ‎‎झाला. माहूर-सारखणी रोडवरील ‎‎लिंबायत फाट्याजवळ बुधवारी रात्री‎हा अपघात झाला.‎ माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी ‎‎येथील प्रवासी ॲपेरिक्षाने (एमएच‎२६ टी ५३९०) घराकडे निघाले होते. ‎‎लिंबायत फाट्याजवळील पेट्रोल ‎‎पंपासमोर अचानक रिक्षासमोर बैल ‎‎आल्याने त्याला धडक बसली.‎त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ‎‎अपघात झाला. त्यात रिक्षात‎बसलेले छत्रपती गवळी (२६, रा. ‎‎नखेगाव) यांच्या डोक्याला व‎छातीला मार लागल्याने त्यांचा‎जागीच मृत्यू झाला. रेखा जाधव‎(३३, रा.लखमापूर) यांच्या‎डोक्याला मार लागल्याने पुढील‎उपचारासाठी पुसद येथे हलवले.‎उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.‎या अपघातात माधव गवळी (३०)‎व शैलेश राठोड (१८, रा.‎लखमापूर) हे गंभीर जखमी झाले.‎परिसरातील नागरिकांनी‎अपघातस्थळी धाव घेत जखमींना‎ माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आणले. डॉक्टरांनी छत्रपती‎गवळीला मृत घोषित केले, तर‎जखमी महिलेला पुढील‎उपचारासाठी पुसद येथे पाठवले.‎परिसरातील ग्रामस्थांनी अपघाताची‎माहिती मिळताच घटनास्थळ गाठून‎जखमींना मदत केली. घटनेची‎माहिती मिळताच सहायक पोलिस‎ निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी‎ सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव‎घेत मदतकार्य केले. पुढील तपास‎ पोलिस करत आहेत.‎ मोकाट गुरांचा मुद्दा ऐरणीवर‎ या अपघातामुळे रस्त्यावरील मोकाट‎गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला‎आहे. राष्ट्रीय महामार्गालगत‎फिरणाऱ्या मोकाट गुरांमुळे यापुर्वीही‎अनेकदा अपघात झाले आहेत.‎आता पुन्हा दोन जणांचा बळी‎गेल्याने, प्रशासनाला जाग येईल,‎अशी अपेक्षा आहे.‎

​भरधाव रिक्षासमोर अचानक बैल ‎‎आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ‎‎अपघात झाल्याने दोन जणांचा मृत्यू ‎‎झाला. माहूर-सारखणी रोडवरील ‎‎लिंबायत फाट्याजवळ बुधवारी रात्री‎हा अपघात झाला.‎ माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी ‎‎येथील प्रवासी ॲपेरिक्षाने (एमएच‎२६ टी ५३९०) घराकडे निघाले होते. ‎‎लिंबायत फाट्याजवळील पेट्रोल ‎‎पंपासमोर अचानक रिक्षासमोर बैल ‎‎आल्याने त्याला धडक बसली.‎त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ‎‎अपघात झाला. त्यात रिक्षात‎बसलेले छत्रपती गवळी (२६, रा. ‎‎नखेगाव) यांच्या डोक्याला व‎छातीला मार लागल्याने त्यांचा‎जागीच मृत्यू झाला. रेखा जाधव‎(३३, रा.लखमापूर) यांच्या‎डोक्याला मार लागल्याने पुढील‎उपचारासाठी पुसद येथे हलवले.‎उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.‎या अपघातात माधव गवळी (३०)‎व शैलेश राठोड (१८, रा.‎लखमापूर) हे गंभीर जखमी झाले.‎परिसरातील नागरिकांनी‎अपघातस्थळी धाव घेत जखमींना‎ माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आणले. डॉक्टरांनी छत्रपती‎गवळीला मृत घोषित केले, तर‎जखमी महिलेला पुढील‎उपचारासाठी पुसद येथे पाठवले.‎परिसरातील ग्रामस्थांनी अपघाताची‎माहिती मिळताच घटनास्थळ गाठून‎जखमींना मदत केली. घटनेची‎माहिती मिळताच सहायक पोलिस‎ निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी‎ सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव‎घेत मदतकार्य केले. पुढील तपास‎ पोलिस करत आहेत.‎ मोकाट गुरांचा मुद्दा ऐरणीवर‎ या अपघातामुळे रस्त्यावरील मोकाट‎गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला‎आहे. राष्ट्रीय महामार्गालगत‎फिरणाऱ्या मोकाट गुरांमुळे यापुर्वीही‎अनेकदा अपघात झाले आहेत.‎आता पुन्हा दोन जणांचा बळी‎गेल्याने, प्रशासनाला जाग येईल,‎अशी अपेक्षा आहे.‎  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment